आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. चंद्रशेखर एक उत्तम अभिनेत्यासोबतच एक मॉडेलही होता. नैराश्येतून चंद्रशेखरने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. 3 जानेवारी रोजी तो आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर श्रीवास्तवचे बुधवारी कुठलेच शूट नव्हते, आणि तो घरीच होता. चंद्रशेखर श्रीवास्तवचा मृतदेह त्याच्याच घरात लटकलेला आढळला. त्याने नेमक्या कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली हे पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. मात्र, असे म्हटले जाते की, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता.
गौतम वासूदेव मेनन दिग्दर्शित आणि धनुष स्टारर 'एनाई नोकी पायुम थोट्टा' या चित्रपटात चंद्रशेखर झळकला होता. याशिवाय त्याने 'वल्लमई थारायो' या गाजलेल्या वेब सीरिजमध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.