आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाक्षिणात्य अभिनेत्रीची दयनीय अवस्था:300 चित्रपटांमध्ये काम केलेल्या जयकुमारीकडे उपचारासाठी नाहीत पैसे, तीन मुलांनीही फिरवली पाठ

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री जयाकुमारी किडनीशी संबंधित आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्या 72 वर्षांच्या असून चेन्नईतील सरकारी रुग्णालयात दाखल आहेच. वृत्तानुसार, जयकुमारी आर्थिक संकटाचा सामना करत असून त्यांच्याकडे उपचारांसाठीही पैसे नाहीत. यामुळे त्यांनी लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

सरकार उचलणार वैद्यकीय खर्च - आरोग्यमंत्री
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांनी जयकुमारी यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांची भेट घेतली. यासोबतच त्यांच्या वैद्यकीय उपचाराची काळजी सरकार घेईल आणि त्यांना घर उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. वृत्तानुसार, जयकुमारी यांना तीन मुले आहेत, परंतु त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी कोणीही रुग्णालयात पोहोचले नाही.

कारकिर्दीत तीनशेहून अधिक चित्रपटांत केले काम
जयकुमारी यांनी 1968 मध्ये 'कलेक्टर मलाथी' या मल्याळम चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी फुटबॉल चॅम्पियन, प्रेम नजर, नुत्रुक्कू नूरू मध्ये जयशंकर आणि मन्निना मागा मध्ये डॉ. राजकुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एंगिरिंडो वंदल आणि हरमाना यांसारख्या चित्रपटांमुळे जयकुमारी यांना ओळख मिळाली.

बातम्या आणखी आहेत...