आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक आरोग्यावर बोलली सामंथा:​​​​​​​मानसिकरित्या त्रस्त असाल तर मदत मागा, संकोच करु नका; मलाही काउंसलरची मदत घ्यावी लागली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी तिने आपल्या मानसिक आरोग्याविषयी आणि मानसिक संघर्षाबद्दल सांगितले आहे. यासोबतच तिने या समस्येतून कशी बाहेर पडली यावरही चर्चा केली. एका फाउंडेशनच्या वतीने मानसिक आरोग्याशी संबंधित सेवा सुरू करण्याच्या कार्यक्रमात अभिनेत्री सहभागी होती.

मानसिक आरोग्यावर मदत मागण्यास संकोच करु नका
सामंथा म्हणाली, 'जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल, तेव्हा मदत मागायला अजिबात संकोच करू नका. माझ्या बाबतीत, मी समुपदेशक आणि मित्रांच्या मदतीने माझ्या मानसिक आरोग्याच्या समस्येतून बाहेर पडू शकले आहे. मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेण्यावर जोर देत अभिनेत्री म्हणाली, 'ज्याप्रमाणे आपण कोणत्याही प्रकारच्या दुखापतीसाठी किंवा समस्येसाठी डॉक्टरांकडे जातो, त्याचप्रमाणे आपल्या हृदयाला आणि मनाला दुखापत झाली असेल किंवा त्रास झाला असेल तर अशा वेळीही आपण डॉक्टरांकडे गेले पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.'

सामंथा पुढे म्हणाली, 'मी माझ्या लाइफच्या दुसऱ्या पार्टमध्ये येऊन यशस्वी झाले आहे याचे एकच कारण ते म्हणजे मी स्ट्राँग होते. हे शक्य झाले कारण माझ्या आजुबाजूचे अनेक लोक मला स्ट्राँग बनण्यात खूप मदत करत होते.'

चौथ्या वेडिंग अॅनिव्हर्सरीपूर्वी मोडले लग्न
सामंथा अक्किनैनी आणि नागा चैत्यनने 6 ऑक्टोबर 2017 ला गोव्यामध्ये पहिले हिंदू पध्दती आणि नंतर 7 ऑक्टोबरला ख्रिश्चन पध्दतीने लग्न केले होते. लग्नानंतरच सामंथाने आपल्या नावापुढे अक्किनैनी लावले होते, मात्र वेगळे झाल्याच्या वृत्तानंतर सामंथाने आपल्या ट्विटर हँडलवरुन अक्किनैनी काढून येथे सामंथा रुथ प्रभु केले होते. 6 ऑक्टोबरला दोघांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण होणार होते, मात्र यापूर्वीच हे दोघं वेगळे झाले.