आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिणेतील RRR, पुष्पा 2.0, बाहुबली आणि KGF सारख्या मोठ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांना तगडी टक्कर दिली आहे. आता साउथ चित्रपटांची क्रेझ बॉलिवूडला कुठेतरी मागे टाकताना दिसत आहे. 83 आणि पुष्पासारख्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस क्लॅशनंतर आता बॉलिवूडचे बडे स्टार्सही दक्षिणेतील स्टार्सशी थेट स्पर्धा घेण्यास टाळाटाळ करत आहेत. यासोबतच आता साउथचे स्टार्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहेत.
रश्मिका मंदाना
नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली रश्मिका मंदाना या वर्षी दोन बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार आहे. रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यासोबतच रश्मिका 'गुड बाय' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
नागा चैतन्य
नागा चैतन्य त्याच्या दमदार अभिनयासाठी आणि 'लव्ह स्टोरी', 'मजिली', 'बंगाररजू' सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. नागा चैतन्य हा साउथचे सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा आहे. नागा चैतन्य यावर्षी आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येऊ शकतो.
विजय देवराकोंडा
'डियर कॉमरेड', 'अर्जुन रेड्डी'सारखे सुपरहिट चित्रपट करणारा विजय देवरकोंडा त्याच्या अॅक्शन चित्रपट आणि दमदार संवादांसाठी ओळखला जातो. साउथमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर विजय आता 'लायगर' या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. 'लायगर'मध्ये विजयसोबत अनन्या पांडे आहे.
विजय सेतुपती
'मास्टर', 'विक्रम वेधा' यांसारख्या चित्रपटांनी चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ मिळवलेला विजय सेतुपती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. तामिळ चित्रपट 'मानागरम'चा हिंदी रिमेक 'मुंबईकर'मध्ये विजय सेतुपती दिसणार आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. विजय सेतुपती श्रीराम राघवन यांच्या मेरी ख्रिसमसमध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.