आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश बाबूला बॉलीवूडमध्ये येण्याची इच्छा नाही:म्हटले- ते मला अफोर्ड करू शकत नाहीत, हिंदीत काम करून वेळ वाया घालवायचा नाही

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये भाषेच्या वादादरम्यान आता महेश बाबूने बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. वास्तविक, महेश एका ट्रेलर लाँच इव्हेंटला पोहोचला होता, त्या दरम्यान तो म्हणाला की बॉलिवूड मला अफोर्ड करू शकत नाही, त्यामुळे मी हिंदी चित्रपटांमध्ये काम करून माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही.

साऊथ इंडस्ट्रीत मला खूप मान-सन्मान मिळाला
मेजर चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात महेश बाबू पोहोचलाहोता. जेव्हा मीडियाने त्याला त्याच्या बॉलीवूड पदार्पणाबद्दल विचारले तेव्हा महेश म्हणाला, "असे नाही की मला ऑफर आल्या नाहीत, परंतु मला वाटते की ते मला अफोर्ड करू शकत नाहीत." जे मला अफोर्ड करू शकत नाहीत, त्यामध्ये काम करण्यात मला माझा वेळ वाया घालवायचा नाही.

माझ्या साऊथ इंडस्ट्रीत मला मिळालेले स्टारडम आणि मान-सन्मान खूप मोठा आहे. त्यामुळे ही इंडस्ट्री सोडून दुसऱ्या इंडस्ट्रीत काम करण्याचा विचार मी कधीच करू शकत नाही. मी नेहमीच चित्रपट करण्याचा आणि मोठा होण्याचा विचार करतो. माझी स्वप्ने आता पूर्ण होत आहेत.

मला फक्त तेलगू चित्रपट करायचे होते
महेश पुढे म्हणाला की, माझे ध्येय स्वत:ला संपूर्ण भारतातील स्टार म्हणून सादर करणे नाही, तर दक्षिणेतील चित्रपटांना संपूर्ण भारतात यशस्वी करणे हा आहे. मला नेहमी तेलगू चित्रपट करायचे होते आणि भारतभरातील लोकांनी ते पाहावेत अशी माझी इच्छा होती. आता हे घडत असल्याने मला खूप आनंद झाला आहे. माझी ताकद तेलुगू चित्रपटांमध्ये आहे यावर माझा नेहमीच विश्वास आहे. यानेच सर्व सीमा ओलांडल्या आणि बॉलीवूड, टॉलिवूड, भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली.

महेश बाबूचे वर्कफ्रंट
महेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा आगामी चित्रपट म्हणजे 'सरकारू वारी पेटला' आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस परशुराम पेटला यांनी केले आहे. यानंतर महेश एसएस राजामौली यांच्या आगामी साहसी थ्रिलरवर काम करणार आहे.

महेशची फी 55 कोटी आहे
महेश बाबूने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1983 मध्ये प्रदर्शित झालेला 'पोरातम' हा त्याचा पहिला चित्रपट होता. यानंतर महेश बाबू 1999 मध्ये रिलीज झालेल्या तेलुगू चित्रपट 'राजा कुमारुदु'मध्ये मुख्य अभिनेता म्हणून दिसला. त्याची बहुतेक कमाई चित्रपट आणि जाहिरातींमधून होते. तो एका चित्रपटासाठी 55 कोटी रुपये घेतो, तर एका जाहिरातीसाठीही अनेक कोटी रुपये घेतो.

बातम्या आणखी आहेत...