आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटसृष्टीत कोरोना:दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण, स्वतःला घरात केले क्वांरटाइन

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या अल्लू अर्जुन काय म्हणाला...

देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन यालादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याने स्वत: बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अल्लू अर्जुनने स्वतःला घरीच क्वारंटाइन केले आहे. सोबतच मागील काही दिवसात जे लोक त्याच्या संपर्कात आले, त्या सर्वांनी स्वतःची चाचणी करुन घेण्याचे आवाहन देखील त्याने केले आहे.

सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे
अल्लू अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "सर्वांना नमस्कार, माझी कोविड - 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला घरी क्वारंटाइन केले असून सर्व प्रोटोकॉलचे पालन करीत आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करुन घ्यावी. घरी रहा, सुरक्षित रहा आणि संधी मिळाल्यास नक्कीच लसीकरण करुन घ्या. मी माझ्या सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी माझी काळजी करू नये, कारण मी ठीक आहे," अशा आशयाची पोस्ट अल्लू अर्जुनने शेअर केली आहे.

गेल्या काही आठवड्यांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना झाला होता संसर्ग
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गेल्या काही आठवड्यांत बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. पूजा हेगडे, अर्जुन रामपाल, नील नितीन मुकेश, सोनू सूद, मनीष मल्होत्रा, अक्षय कुमार, गोविंदा, विक्की कौशल, आमिर खान, आर माधवन, कतरिना कैफ, भूमी पेडणेकर, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, परेश रावल, सतीश कौशिक, आशुतोष राणा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना कोरोनची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...