आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे ज्युनिअर एनटीआर:अल्पवयीन मुलीसोबत लग्न करत असल्याने वादात अडकला होता हा दाक्षिणात्य सुपरस्टार, प्रत्येक चित्रपटासाठी घेतो कोट्यवधी रुपये

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2011मध्ये केले होते लक्ष्मी प्रणतीसोबत लग्न

साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1983 साली हैदराबादमध्ये जन्मलेला हा अभिनेता गतकाळातील अभिनेते आणि आंध्रप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा नातू आहे. स्टुडंट नं. 1, राखी, सिम्हाद्री, टेंपर, प्रेमाथो, जनता गैराज आणि बादशाहसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या ज्युनिअर एनटीआरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्याच्याशी निगडीत काही खास गोष्टी...

नंदमुरी तारक रामा राव उर्फ ज्युनिअर एनटीआरने 1991 मध्ये रिलीज झालेल्या ब्रह्मार्षी विश्वामित्र या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याचे आजोबा एनटीआर यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर 1996 मध्ये रामायण या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने काम केले होते. या चित्रपटाला नॅशनल फिल्म अवॉर्ड ऑफ बेस्ट चिल्ड्रन फिल्म म्हणून गौरविण्यात आले होते.

ज्युनिअर एनटीआरने 2004 मध्ये तेलुगू चित्रपटाद्वारे लीड अॅक्टर म्हणून पदार्पण केले होते. त्याचा पहिलाच चित्रपट त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्यानंतर या अभिनेत्याने अनेक हिट चित्रपट दिले. 2013 मध्ये आलेल्या त्याच्या बादशाह या चित्रपटाने 50 दिवसांत तब्बल 480 मिलियनचे कलेक्शन केले होते.

वादात अडकले होते लग्न
2010 मध्ये विजयवाडाचे वकील सिंगुलुरी शांती प्रसाद यांनी ज्युनियर एनटीआर विरोधात चाइल्ड मॅरेज अॅक्टअंतर्गत तक्रार दाखल केली होती. ज्युनिअर एनटीवर बिझनेसमन (तेलुगु चॅनलचे मालक) नर्ने श्रीनिवास राव यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी प्रणतीसोबत लग्न करत असल्याचा आरोप या वकिलांनी केला होता. या प्रकरणानंतर प्रणती 18 वर्षांची झाल्यानंतर 5 मे 2011 रोजी दोघांचे लग्न झाले होते. ज्युनियर एनटीआर आणि प्रणती या दाम्पत्याला दोन मुलगे आहेत.

'बिग बॉस'च्या साऊथ व्हर्जनसाठी मिळाले होते 25 कोटी
बिग बॉसच्या साऊथ व्हर्जनसाठी ज्युनिअर एनटीआरला 25 कोटी रुपये मिळाले होते. मानधनाचा हा आकडा KBC चे तेलुगु व्हर्जन होस्ट करणारे नागार्जुन आणि चिरंजीवी यांच्या मानधनापेक्षा अधिक होता

इलेक्शन कॅम्पनदरम्यान घडली होती गंभीर दुर्घटना
2009च्या जनरल इलेक्शनवेळी तेलुगुदेशम पक्षाच्या कॅम्पेननंतर हैदराबादला परत असताना ज्युनिअर एनटीआरच्या कारला नलगोंडाच्या सूर्यापेट येथे गंभीर अपघात झाला होता. हा अपघात एवढा भयावह होता, की एनटीआर आणि त्याचे काही मित्र कारमधून बाहेर फेकले गेले होते. त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

ज्युनिअर एनटीआरच्या वडिलांनी दोनदा केले होते लग्न
ज्युनिअर एनटीआरचे वडील नंदमूरी हरिकृष्ण यांनी 1973 मध्ये पहिले लग्न लक्ष्मी यांच्यासोबत केले होते. त्यांना जानकी राम आणि कल्याण राम ही दोन मुले आणि सुहासिनी ही एक मुलगी आहे. त्यानंतर नंदमुरी यांनी शालिनी यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले. ज्युनिअर एनटीआर हा नंदमुरी आणि शालिनी यांचा मुलगा आहे.

आलिया भट्ट दिसणार ज्युनिअर एनटीआर
ज्युनिअर एनटीआर लवकरच एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटात आलिया भट्ट, राम चरण आणि अजय देवगणसोबत दिसणार आहे. हा अभिनेता आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी 18-20 कोटी रुपये मानधन घेतो.

बातम्या आणखी आहेत...