आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात सेलेब्स:साऊथ सुपरस्टार महेश बाबू कोविड पॉझिटिव्ह, स्वरा भास्करसह तिच्या संपूर्ण कुटुंबालाही कोरोनाची लागण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेशच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा कोविड-19 चाचणी अहवाल येणे बाकी आहे.

साऊथ सुपरस्टार महेश बाबूला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः महेश बाबूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, "सर्व आवश्यक खबरदारी घेतल्यानंतर देखील माझी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी क्वारंटाइन ठेवले आहे आणि सर्व वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी अशी मी विनंती करतो. ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, जेणेकरून त्यांचा दवाखान्यात जाण्याचा धोका कमी होईल. कृपया कोविडचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा."

महेशच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा कोविड-19 चाचणी अहवाल येणे बाकी आहे. महेश बाबूपूर्वी त्याची मेहुणी आणि अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिलादेखील कोरोनाची लागण झाली होती.

  • स्वरा भास्कर आणि तिच्या संपूर्ण कुटुंबालाही कोरोनाची लागण

अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण झाली आहे. स्वराने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. तिने पोस्ट शेअर केली आणि लिहिले, "हॅलो कोविड. नुकताच माझा आरटी-पीसीआर रिपोर्ट आला आहे. त्यात मी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहे. मी स्वतःला क्वारंटाइन ठेवले आहे. मला ताप, डोकेदुखी आणि पदार्थांची चव न कळणे यासारखी लक्षणे जाणवत आहेत. मी डबल व्हॅक्सिन घेतली आहे. त्यामुळे लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. मी घरी आहे. तुम्ही सुद्धा सुरक्षित रहा."

स्वराने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "कोविडची लक्षणे 5 जानेवारी 2022 पासून दिसायला सुरुवात झाली. RT-PCR चाचणीने याची पुष्टी केली आहे. मी आणि माझे कुटुंब 5 जानेवारीच्या संध्याकाळपासून आयसोलेशनमध्ये आहोत... आणि आम्ही सर्व आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहोत. मी. गेल्या आठवड्यापूर्वी मी ज्यांना भेटले होते, त्या सर्वांना मला कोविडची लागण झाल्याची माहिती दिली होती. परंतु, माझ्या संपर्कात कोणी आले असल्यास, कृपया स्वतःची चाचणी करून घ्या. डबल मास्क घाला आणि प्रत्येकजण सुरक्षित रहा,"अशा आशयाची पोस्ट स्वराने लिहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...