आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा वाढता विळखा:दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणला कोरोनाची लागण, फार्महाऊसवर स्वतःला केले क्वारंटाइन

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिला रिपोर्ट आला होता निगेटिव्ह

देशात कोरोनाच्या दुस-या लाटेनंतर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची चाचाणी पॉझिटिव्ह येताच पवनने स्वत:ला फार्महाउसवर क्वारंटाइन केले असून सध्या डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहे.

पहिला रिपोर्ट आला होता निगेटिव्ह
काही दिवसांपूर्वी पवन कल्याणने कोरोना चाचणी केली होती. तेव्हा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण फुफ्फुसांमध्ये इनफेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा पवनची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली. सध्या पवनने स्वत:ला फार्महाउसवर क्वारंटाइन करुन घेतले होते. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्याला ऑक्सिजन लावलेले दिसत आहे.

पवन कल्याणच्या 'वकील साब'ने बॉक्स ऑफिस गाजवले
पवन कल्याणचा ‘वकील साब’ हा चित्रपट 9 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पवन कल्याणच्या 'वकील साब’ने कमाईच्या बाबतीत पहिल्याच आठवड्यात विजय आणि विजय सेतुपती स्टारर 'मास्टर’ला पिछाडले आहे. महामारीच्या काळात पहिल्या आठवड्यात सर्वात जास्त कमाई करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत 70 कोटी रुपयांची कमाई केली होती. जानेवारीत रिलीज झालेल्या 'मास्टर’ने तीन दिवसांत 69 कोटीची कमाई केली होती. ही कमाई फक्त दक्षिणेतच केली होती. ‘वकील साब’ हा चित्रपट अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू स्टारर ‘पिंक’ चित्रपटाचा रिमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...