आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम चरणला कोरोनाची लागण:दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण तेजाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह, म्हणाला - मला कोणतीच लक्षणे नसून मी घरीच क्वारंटाइनमध्ये आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम चरणच्या वडिलांनाही झाली होती कोरोनाची लागण

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण तेजाला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः राम चरणने मंगळवारी सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून दिली. कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राम चरणने स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे.

पोस्ट शेअर करत राम चरणने लिहिले, ‘माझ्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला कोणतीच लक्षणे नसून मी घरीच क्वारंटाइनमध्ये राहत आहे. लवकरच बरा होऊन परत येईन अशी आशा करतो’, असे त्याने म्हटले आहे. त्याचसोबत गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्यांना त्याने कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

राम चरणच्या वडिलांनाही झाली होती कोरोनाची लागण
नोव्हेंबर महिन्यात राम चरण तेजाचे वडील आणि साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी यांचाही कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काही दिवसांनी चिरंजीवी यांनी सांगितले होते की, त्यांनी तीन वेळा कोविड टेस्ट करुन घेतली होती, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. सोबतच पीसीआर किट खराब असल्याने पहिली चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा खुलासाही त्यांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...