आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाईजान:सलमान खानच्या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरणची एन्ट्री, ऑफर ऐकताच अभिनेत्याने दिला होकार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑफर ऐकताच राम चरणने दिला होकार

सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाळी' हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. शूटिंगपासूनच या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. कधी या चित्रपटाच्या शीर्षकात तर कधी कलाकारांमध्ये बदल झाल्याच्या बातम्या आल्या. पुर्वी चित्रपटाचे शीर्षक कभी ईद कभी दिवाली असे होते जे आता बदलून भाईजान असे झाले आहे. आता अलीकडेच या चित्रपटात राम चरण एका छोट्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, व्यंकटेश, जस्सी गिल, पलक तिवारी आणि राघव जुयाल देखील दिसणार आहेत. त्याचबरोबर फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

ऑफर ऐकताच राम चरणने दिला होकार
सध्या सलमान खान हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. येथे त्याचे 25 दिवसांचे शेड्यूल आहे, तो येथे या चित्रपटाचे एक भव्य गाणे देखील शूट करणार आहे. या गाण्यात राम चरण देखील कॅमिओमध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान हैदराबादमध्ये राम चरणला भेटला आणि इथेच त्याने राम चरणला कॅमिओची ऑफर दिली. ऑफर ऐकून साऊथ सुपरस्टारनेही लगेच होकार दिला.

सलमानची रामचरणशी आहे चांगली मैत्री
सलमान खानची राम चरण आणि त्याचे वडील चिरंजीवी यांच्याशी चांगली मैत्री आहे. चिरंजीवी यांच्या आगामी 'गॉड फादर' या चित्रपटातही सलमान कॅमिओ करताना दिसणार आहे. 'भाईजान'मधला राम चरणचा कॅमिओही याच मैत्रीचा भाग असल्याचे समजते.

सलमान करत आहे या चित्रपटाची निर्मिती
ETimes च्या रिपोर्टनुसार, 'कभी ईद कभी दिवाळी'चे नाव पूर्वीप्रमाणेच 'भाईजान' असे ठेवण्यात आले आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप निर्मात्यांनी केलेली नाही. खरंतर आता सलमान खान या चित्रपटाची निर्मिती करत आहे. याआधी सलमानचा मित्र आणि निर्माता साजिद नाडियादवाला निर्मिती करणार होते.

क्रिएटिव्ह मतभेदांमुळे आयुष चित्रपटातून बाहेर पडला
या चित्रपटात सलमानचा मेहुणा आयुष आणि झहीर इक्बाल देखील दिसणार होते. पण आता त्याचा मेहुणा म्हणजेच आयुष शर्मा या चित्रपटातून बाहेर पडला आहे. यासोबतच झहीर इक्बालची रिप्लेसमेंटही शोधली जात आहे.

'अंतिम द फायनल ट्रुथ' या चित्रपटात आयुष शर्मा आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. 'भाईजान'मधून ते दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार होते. पण आता तसे होताना दिसणार नाही. रिपोर्ट्सनुसार, सलमानचा मेहुणा आयुष चित्रपटाच्या टीमसोबत काही क्रिएटिव्ह मतभेदांमुळे या प्रोजेक्टमधून बाहेर पडला आहे. आयुषने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने एका दिवसाचे शूटिंगही पूर्ण केले होते.