आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे 'बाहुबली':खवय्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासला करायचे होते हॉटेल इंडस्ट्रीत करिअर, 'बाहुबली'साठी राजामौलींनी ठेवली होती एक अट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभास जन्म 23 ऑक्टोबर 1979 ला हैदराबादच्या चेन्नईमध्ये झाला.

‘बाहुबली’ मुळे रातोरात सुपरस्टार होणारा अभिनेता प्रभासचा आज 41 वा वाढदिवस आहे. यंदा त्याचा वाढदिवस अमेरिकेत साजरा होणार आहे. कारण त्याचा सुपरहिट चित्रपट तेथे रिलीज होणार आहे.
तर जाणून घेऊ प्रभासच्या जीवनातील काही महत्त्वाच्या बाबी...

प्रभास जन्म 23 ऑक्टोबर 1979 ला हैदराबादच्या चेन्नईमध्ये झाला हाेता. प्रभासचे मूळ नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलापति आहे. प्रभासची कौटुंबिक पार्श्वभूमी सिने इंडस्ट्रीच आहे. त्याचे वडील दिग्दर्शक सूर्यनारायण राजू आहेत ते तेलुगु अभिनेते उप्पलापती कृष्णम राजूचे पुतणे आहेत. प्रभासने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली होती. मात्र आता तो बॉलिवूड प्रेमींचा सुपरहिरो झाला आहे. प्रभासने तेलुगू चित्रपट 'ईश्वर’ मधून सिने कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याने ‘अॅक्शन जॅक्सन’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यात त्याने फक्त पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. खरं तर, प्रभासला हिरो व्हायचे नव्हतं. त्याला हाॅटेल इंडस्ट्रीत आपले करिअर करायचे होते. शिवाय तो एक इंजीनियरदेखील आहे. त्याने हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून बी.टेक केले आहे.

  • ‘बाहुबली’त काम करताना उरले नव्हते पैसे

राजामौली यांनी जेव्हा प्रभासला आपल्या 'बाहुबली' या एपिक चित्रपटासाठी साइन केले, तेव्हा त्यांनी प्रभाससमोर एक अट ठेवली होती की, हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तो एकही चित्रपट साइन करणार नाही. तथापि, “बाहुबली” पूर्वी प्रभास अनेक हिट साउथ चित्रपटांमध्ये काम केले होते. पण जेव्हा त्याने हा चित्रपट करण्यास सुरूवात केली तेव्हा त्याने 10 कोटी रुपयांची ऑफरदेखील नाकारली. चार वर्षांपर्यंत त्याने कोणत्याही प्रकल्पावर स्वाक्षरी केली नाही त्यामुळे प्रभासकडे पैसे उरले नव्हते. पूर्ण समर्पणानुसार, त्याने या चित्रपटावर काम केले आणि 30 किलो वजनदेखील वाढवले होते.

  • आहाराचे पथ्य संपल्यानंतर 15 प्रकारची बिर्याणी खायचा

राजामौली यांनी प्रभाससोबतचा 'बाहुबली’च्या शूटिंगदरम्यान एक किस्सा शेअर केला होता. प्रभासला जेव्हा आपल्या आहाराच्या पथ्यातून ब्रेक मिळायचा तेव्हा तो 15 प्रकारची बिर्याणी खात होता. एकदा जेवणात त्याचे सर्व आवडते पदार्थ होते फक्त चटणी नव्हती त्यासाठी त्याने जेवण सोडले आणि घरी भावजीला फोन केला. त्यांनी रात्री दोन वाजता आपल्या पत्नीला जागे करुन चटणी बनवली. त्यानंतर प्रभासने जेवण केले.

  • 'डार्लिंग’ ते 'पब्सी’च्या नावांनी प्रसिद्ध आहे प्रभास

प्रभासला दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीत प्रेमाने डार्लिंग संबोधले जाते. अनेक लोक तर त्याला प्रभा, पब्सी आणि मिस्टर परफेक्टच्या नावानेदेखील बोलवतात. प्रभास मोस्ट एलिजिबल बॅचलर मानला जातो. काही दिवसांपूर्वी प्रभासला 60 हजार मुलींनी लग्नासाठी प्रपाेज केल्याची बातमी होती. मात्र त्याने नकार दिला होता. मादाम तुसाँमध्ये प्रभासचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला आहे, आतापर्यंत कोणत्याही दाक्षिणात्य स्टारचा तेथे पुतळा बसवण्यात आला नाही.

पुरस्कार

  • 2004 मध्ये "वर्षम' साठी संतोषम फॉर द यंग परफॉर्मरचा पुरस्कार
  • 2010 मध्ये "डार्लिंग'साठी समीक्षकांची पहिली पसंती पुरस्कार
  • 2013 मध्ये "मिर्ची' साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा नंदी पुरस्कार
  • 2015 मध्ये"बाहुबली- द बिगनिंग' साठी उत्कृष्ट अभिनेत्याचा संतोषम पुरस्कार
  • 2017 "बाहुबली-द कन्क्लूजन' साठी भारतीय दाक्षिणात्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवला.