आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज नयनताराचे लग्न:75 चित्रपटांत झळकलेली साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा, एकेकाळी व्हायचे होते तिला CA

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नयनताराचा जन्म बंगलोरमध्ये ख्रिश्चन कुटुंबात झाला.

आज साऊथची सुपरस्टार नयनतारा आणि चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश विजन विवाहबंधनात अडकले आहेत. नयनताराने तामिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेतील जवळपास 75 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 2003 मध्ये 'मानसिनक्करे' या मल्याळम चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती.

नयनताराचा जन्म बंगलोरमध्ये ख्रिश्चन कुटुंबात झाला, तिचे वडील हवाई दलात होते. ते निवृत्ती झाल्यानंतर त्यांचे कुटुंब केरळला आले. येथे नयनताराने तिचे महाविद्यालयीन शिक्षण चालू ठेवले. तर तिचे शालेय शिक्षण चेन्नई, जामनगर, दिल्ली आणि गुजरातमधील शाळांमध्ये झाले.

नयनतारा कॉलेजच्या दिवसात मॉडेलिंग करायची

नयनताराने 2003 मध्ये मल्याळम चित्रपट 'मनसिनक्करे' मधून अभिनयाची सुरुवात केली. तेव्हा ती कॉलेजमध्ये होती. तिने 'अय्या' (2005) या तामिळ सिनेमातून 'लक्ष्मी' (2006) या तेलुगु सिनेमांत काम केले. नयनताराला अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए व्हायचे होते, पण तिने चित्रपटात काम करण्यासाठी सीए होण्याचे स्वप्न अर्धवट सोडले.

कन्नड सिनेसृष्टीत एंट्री

तेलुगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये नाव कमावल्यानंतर, नयनताराने 2010 मध्ये 'सुपर' या चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. 'श्री रामा राज्यम' या चित्रपटात तिने माता सीता ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी नयनताराला सर्वोत्कृष्ट तेलुगू अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

चर्चेत राहिली लव्ह लाईफ
नयनताराची लव्ह लाईफही नेहमीच चर्चेत राहिली. तिचे नाव यापूर्वी दिग्दर्शक आणि अभिनेते सिलंबरासन राजेंदर यांच्याशी जोडले गेले होते, परंतु 2006 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर 2008 मध्ये तिचे नाव प्रभू देवासोबत जोडले गेले. 2009 मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केल्याचेही वृत्त होते आणि नयनताराने प्रभू देवाच्या नावाचा टॅटूही गोंदवला होता. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या नयनताराने 2011 मध्ये हिंदू धर्म स्वीकारला. चित्रपटांमध्ये आल्यानंतर तिने स्वतःचे नावही बदलले होते.

फोर्ब्स इंडियाच्या यादीत मिळवले स्थान
इन्फिनिटी नेटवर्थ या वेबसाइटनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे 22 मिलियन डॉलर (सुमारे 171 कोटी रुपये) आहे. नयनतारा प्रत्येक चित्रपटासाठी 3 कोटी रुपये घेते. 2018 मध्ये, फोर्ब्स इंडियाच्या "सेलिब्रिटी 100" यादीत स्थान मिळवणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ती पहिली महिला अभिनेत्री होती. तिची वर्षभराची एकूण कमाई 15.17 कोटी इतकी होती.

बातम्या आणखी आहेत...