आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसपी बालासुब्रमण्यम हेल्थ अपडेट:26 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी झुंज देणा-या बालासुब्रमण्यम यांच्या प्रकृतीत सुधारणा, शुद्धीवर आले असून व्हेंटिलेटरवर आहेत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालासुब्रमण्यम यांनी संवाद साधण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न केला,

5 ऑगस्टपासून चेन्नईच्या रूग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेले प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. एमजीएम हॉस्पिटलने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, ते शुद्धीवर असून फिजिओथेरपीला सपोर्ट करीत आहे. पण अद्याप त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आलेले नाही. त्यांचा मुलगा चरण एसपी यांनी व्हिडिओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

  • चरण यांनी व्हिडिओमध्ये अपडेट दिले

एमजीएम हेल्थकेअरच्या वैद्यकीय सेवा सहाय्यक संचालक डॉ. अनुराधा भास्करन यांनी सांगितले की, एसपींची प्रकृती स्थिर आहे. ते शुद्धीवर आहेत आणि प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देत आहेत. या व्यतिरिक्त हॉस्पिटलची टीम त्यांची विशेष काळजी घेत आहे. व्हिडिओमध्ये एसपी यांचा मुलगा चरण यांनी सांगितले की, त्यांचे फुफ्फुस सुधारत आहे, ते बरे होत आहे.

  • आईचे हेल्थ अपडेटही दिले

चरण पुढे म्हणाले की, वडिलांनी संवाद साधण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पेन पकडणे कठीण झाले. हा संपूर्ण आठवडा ते माझ्याशी बोलत राहतील. मी रुग्णालयातील कर्मचार्‍यांना त्यांच्यासाठी वर्तमानपत्र वाचण्यास सांगितले आहे. मी वडिलांना विचारले की तुम्ही ठीक आहात ना, तर त्यांनी होय म्हणून उत्तर दिले. ते संगीत ऐकत आहेत आणि गाण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बरे होण्याची चांगली चिन्हे आहेत. याशिवाय आईची तब्येत ठीक असून ती घरी विश्रांती घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.