आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एस.पी. बालासुब्रमण्यम यांचे 3 किस्से:बालासुब्रमण्यम यांना गायक नव्हे व्हायचे होते इंजिनिअर, आयुष्यभर राहिली 'या' एका गोष्टीची खंत

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एसपी बालासुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे ध्येय गायक व्हायचे नव्हते. जेव्हा ते बॉलिवूडमध्ये आले तेव्हा संगीतकार लक्ष्मीकांत यांना त्यांचा आवाज आवडला नव्हता.

पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गायक एस.पी. बालासुब्रमण्यम यांचे निधन झाले आहे. 74 वर्षीय एसपी मागील 52 दिवसांपासून चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल होते. तिथे त्यांच्यावर कोविड -19 वर उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती अतिशय ढासळली होती. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बालासुब्रमण्यम अपघाताने संगीत क्षेत्रात आले. त्यांची गायक व्हायची इच्छा नव्हती. मात्र संगीत क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सहा भाषांत त्यांनी सुमारे 40 हजारांहून अधिक गाणी स्वरबद्ध केली. मात्र त्यांना कधीच गायक व्हायचे नव्हते. याचा खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला होता.

2014 साली 52 व्या बंगळुरू गणेश उत्सवात बोलताना एसपी म्हणाले होते, माझे ध्येय गायक व्हायचे कधीच नव्हते. मी अपघाताने या क्षेत्रात आलो. मी खूप चांगला गातो, याच्याशी मी सहमत आहे. पण मला इंजिनिअर व्हायचे होते. मला कधीही सेलिब्रिटी माणूस व्हायचे नव्हते.” या कार्यक्रमात ते 1975 पासून परफॉर्म करत होते.

  • रफी यांच्यासोबत गाण्याची इच्छा राहिली अपूर्ण

बालासुब्रमण्यम नेहमी मोहम्मद रफी यांच्या गाण्याचे चाहते होते. त्यांना त्यांच्यासोबत एखाद्या चित्रपटात गाणेही गायचे होते, परंतु त्यांना संधीच मिळाली नाही. बालासुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते रफी साहेबांचे चाहते होते. त्यांना रफी साहेबांसाेबत गाण्याची संधी मिळाली नाही याची त्यांना खंत आहे. रफी साहेब एका तेलुगू चित्रपटाच्या रेकॉर्डिंगसाठी आले होते, त्यावेळी बालासुब्रमण्यम यांची भेट झाली होती. त्यावेळी सराव सुरू असल्यामुळे बालासुब्रमण्यम त्यांच्या पायांना स्पर्श करून आले होते. त्यांना रफी साहेबांची सर्वच गाणी खूप आवडतात, परंतु ‘तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है...’ हे गाणे खूप आवडते.

  • लक्ष्मीकांत यांना पहिले आवाज आवडला नव्हता

एसपींनी मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ते पहिल्यांदा एक-दुजे के लिए या हिंदी चित्रपटासाठी गाणी स्वरबद्ध करणार होते, तेव्हा संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडी फेम) त्यांच्या आवाजाने खूश नव्हते. कारण त्यांनी यापूर्वी त्यांना कधीच ऐकले नव्हते.

लक्ष्मीकांत म्हणाले होते- 'हा मद्रासी मुलगा माझ्या गाण्यांना न्याय देऊ शकणार नाही.' नंतरचे चित्रपटाचे दिग्दर्शक के.के. बालाचंदर यांनी चित्रपटाच्या शेवटपर्यंत मुख्य पात्र चांगले हिंदी बोलत नाही, याकडे लक्ष्मीकांत यांचे लक्ष वेधले. त्यामुळे उच्चारामध्ये काही गडबड झाली तरी ती पात्रासाठी फिट बसले, असे बालाचंदर यांनी लक्ष्मीकांत यांना सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...