आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर रिलीज:'स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स'चा मराठी ट्रेलर रिलीज, पवित्र प्रभाकर असेल सुपरहिरो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्पायडरमॅनचे पात्र माइल्स मोरालेस चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. इंग्रजी, मराठी आणि हिंदीसह तब्बल 10 भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतीय व्हर्जनमध्ये पवित्र प्रभाकर हे पात्र दिसणार आहे.

पाहा चित्रपटाचा मराठी ट्रेलर...

भारतीय बॉक्स ऑफिसवर स्पायडर-मॅन पटांनी कायमच अभूतपूर्व यश कमावले असून स्पायडरमॅन हा आपल्या देशाचा सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो राहिला आहे. लहान-थोरांना, सर्वांनाच हा सुपरहिरो आपलासा वाटतो. देशात स्पायडरमॅनचा चाहता वर्ग अफाट असून त्याची भुरळ सर्वांना झपाटून टाकते. हाच धागा साधून निर्मात्यांनी स्पायडरमॅनला सर्व भारतीयांच्या अधिक जवळ आणण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे, ज्यामुळे हा एक पॅन-इंडिया चित्रपट ठरला असून 2023 मधील सर्वाधिक पसंतीची कलाकृती बनली आहे.

इंग्रजीशिवाय, ‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषांत प्रदर्शित होणार आहे.

स्पायडरमॅनला घराघरापर्यंत पोहोचवले - सोनी कंटेंट हेड

सोनी पिक्चर्स रिलिझिंग इंटरनॅशनल इंडियाचे महाव्यवस्थापक आणि प्रमुख शोनी पंजीकरण सांगतात, "स्पायडरमॅन हा भारतातील सर्वांच्या पसंतीचा सुपरहिरो आहे आणि कोणताही स्पायडरमॅन चित्रपट​​​​​म्हणजे संपूर्ण भारतातील खरी आणि वास्तविक घटना आहे. 'नो वे होम' या शेवटच्या स्पायडरमॅन चित्रपटाने स्पायडरमॅनला प्रेक्षकांकडून मिळालेल्या पसंतीत आणखीन भर घातली. प्रदेश आणि भाषांमधील कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे भारतातील प्रत्येक घराने त्यांच्या स्वतःच्या भाषेत आवडत्या सुपरहिरोचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा होती. देशभरातील प्रेक्षक या चित्रपटावर प्रेम कर तील याची खात्री मला वाटते."

स्पायडर युनिव्हर्सशी लिंक होणार मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स
या चित्रपटाच्या रिलीजमुळे स्पायडरमॅन युनिव्हर्स मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सशी जोडले जाईल जोकिम डॉस सँटोस, कॅम्प पॉवर्स आणि जस्टिन के थॉम्पसन यांनी 'स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' दिग्दर्शित केले आहे. ऑस्कर विजेते फिल लॉर्ड, ख्रिस्तोफर मिलर आणि डेव्हिड कोल्हॅम यांनी अॅनिमेटेड आवृत्तीसाठी व्हॉईस-ओव्हर दिला आहे. इंडियन व्हर्जनसाठी करण सोनीने पवित्र प्रभाकरला आपला आवाज दिला आहे. हा चित्रपट येत्या 2 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.