आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी स्पेशल:बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी आपल्या मुलीला बनवणार नव्हती हीरोइन, जान्हवीच्या डेब्यू फिल्मच्या रिलीजच्या पाच महिन्यांपूर्वीच झाले होते निधन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीदेवी यांचा आज 56 वा वाढदिवस आहे.

श्रीदेवी यांचा आज वाढदिवस. त्या आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 56 वर्षे पूर्ण केली असती. 2018 मध्ये, वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी जगाला कायमचा निरोप घेतला. श्रीदेवी यांना त्यांची थोरली मुलगी जान्हवीचा पदार्पणातील धडक हा चित्रपट बघता आला नाही. जुलै 2018 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तर त्यापूर्वीच म्हणजे पाच महिन्यांपूर्वी 24 फेब्रुवारीला श्रीदेवी यांचे निधन झाले होते.

  • जान्हवीला चित्रपटसृष्टीत आणू इच्छित नव्हत्या श्रीदेवी

विशेष म्हणजे पाच भाषांमध्ये 300 हून अधिक चित्रपटात झळकलेल्या आणि बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणा-या श्रीदेवी आपल्या मुलीला मात्र या इंडस्ट्रीत आणू इच्छित नव्हत्या.

खुद्द जान्हवीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. जान्हवी म्हणाली होती, 'आईला वाटायचं की मी खूप भोळी आहे. माझ्यापेक्षा खुशीसाठी फिल्म इंडस्ट्री योग्य राहिल, असा तिचा विचार होता. आईला माझ्यासाठी अतिशय आरामशीर आयुष्य हवे होते. 'धडक'च्या सेटवर ती कधीच आली नाही. चित्रपटाची काही दृश्ये पाहून तिला खूप आनंद झाला होता. ते पाहून तिने मला सांगितले की, तुला अजून खूप शिकायचे आहे. तसेच चित्रपटाच्या दुसर्‍या भागात मेकअप न लावण्याचा सल्ला तिने दिला होता.'

  • फ्लॉप ठरला होता 'धडक'

धडक जान्हवीचा बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट होता. 2016 मध्ये रिलीज झालेल्या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट सैराटचा हा हिंदी रीमेक होता. चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. पण धडक चित्रपट फारसा चालला नाही. या चित्रपटात जान्हवी सोबत शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर दिसला होता.

  • पदार्पणाची तयारी करत आहे खुशी

जान्हवीचा दुसरा चित्रपट 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' 12 ऑगस्ट 2020 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जान्हवी झोया अख्तरची शॉर्ट फिल्म 'घोस्ट स्टोरीज' मध्ये दिसली होती. त्याचबरोबर तिची धाकटी बहीण खुशी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पणाची करण्याची तयारी करत आहे. खुशी न्यूयॉर्क अ‍ॅक्टिंग स्कूलमधून कोर्स करत आहे. तिला करण जोहर चित्रपटात लाँच करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...