आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जान्हवी कपूर स्टारर 'रुही' हा चित्रपट येत्या 11 मार्च रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात जान्हवी दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. पहिली भूमिका अफजाची असून ती एक चेटकीण असते, तर दुसरा रुही जी एक सामान्य मुलगी आहे. जान्हवीचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी, ती 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' मध्ये दिसली होती. हा चित्रपट 12 ऑगस्ट 2020 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. जान्हवी आता चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतेय. मात्र तिने चित्रपटसृष्टीत न येता दुस-या क्षेत्रात करिअर करावे, अशी तिची आई म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची इच्छा होती.
मी डॉक्टर व्हावे, अशी होती आईची इच्छा
जान्हवीने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते, 'जेव्हा मी आईकडे अभिनेत्री व्हायची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी आमच्यात बरेच संभाषण झाले होते. आई खरं तर यासाठी तयार नव्हती. पण माझी अभिनयात रुची निर्माण झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. मला डॉक्टर करायची तिची इच्छा होती. पण आज मी आईला सॉरी म्हणू इच्छिते, कारण त्यावेळी माझ्यात डॉक्टर बननण्याचा समजूतदारपण नव्हता.'
जान्हवी पुढे म्हणाली होती, 'मी अभिनय क्षेत्राची निवड केल्याचा निर्णय घेतल्याने आई टेन्शनमध्ये होती. पण वडिलांनी तिला मेंटली प्रिपेअर केले. माझ्या वडिलांचा माझ्या करिअर निवडीसाठी कायम पाठिंबा राहिला आहे. त्यांच्या सांगण्यावरुनच आईने मला या क्षेत्रात येण्याची परवानगी दिली होती.'
जान्हवीने सांगितले होते, "मी आणि खुशीने आयुष्य आरामात जगावे, अशी आईची इच्छा होती. तिचे म्हणणे होते, तिच्या मुलींनी त्यांचे आयुष्य ऐशोआरामात जगावे, यासाठी तिने खूप संघर्ष केला होता, तो संघर्ष कधीही तिच्या मुलींच्या वाट्याला येऊ नये, यासाठी ती प्रयत्न करत होती." पण जान्हवी म्हणाली, की मी समाधानी व्यक्ती नाही. आईवडिलांच्या पैशांवर संपूर्ण आयुष्य मला जगायचे नाही.'
जान्हवीने सांगितले, की या चित्रपटाने मला आईच्या निधनाच्या धक्क्यातून सावरायला खूप मदत केली. यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने श्रीदेवी यांचे निधन झाले होते.
श्रीदेवीला मुलीचा पदार्पणाचा चित्रपट बघता आला नाही
2018 मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. त्यांची थोरली मुलगी जान्हवीच्या डेब्यू चित्रपट 'धडक'च्या रिलीज आधीच त्यांचे निधन झाले होते. हा चित्रपट जुलै 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच्या पाच महिन्यांपूर्वीच म्हणजे 24 फेब्रुवारीला श्रीदेवी यांचे निधन झाले होते.
खुशी करतेय पदार्पणाची तयारी
जान्हवीची धाकटी बहीण खुशीदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे. खुशी न्यूयॉर्कमधील अॅक्टिंग स्कूलमधून कोर्स करत आहे. त्यानंतर तिला करण जोहर चित्रपटात लाँच करु शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.