आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेथ अ‍ॅनिव्हर्सरी:300 चित्रपटांमध्ये झळकलेल्या श्रीदेवी होत्या बॉलिवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार, स्टारडम एवढे होते की सलमानलाही वाटायची भीती

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीदेवी यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या दिलेखचक अदा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

अभिनेत्री श्रीदेवी यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत त्यांचे निधन झाले होते. 'सदमा' या चित्रपटात स्मृतीभ्रंश झालेल्या तरुणीची भूमिका असो, किंवा 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात 'हवाहवाई...' गाण्यावर थिरकून प्रेक्षकांना भूरळ घालणारी मनमौजी तरुणी असो, श्रीदेवी यांनी सिल्व्हर स्क्रिनवर साकारलेल्या आपल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . श्रीदेवी या अशा एक अभिनेत्री होत्या, ज्यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या दिलेखचक अदा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट, 1963 मध्ये तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात झाला होता. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली. 1976 मध्ये त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर 'मुंदरु मुदिची' या तामिळ चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत काम करायला हिरोइन नाही तर हिरोही घाबरत असत.

बॉलिवूडमध्ये त्यांनी 1979 मध्ये 'सोलहवां सावन' या चित्रपटातून पदार्पण केले. परंतू हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. 1983 मध्ये श्रीदेवीने 'हिम्मतवाला' या चित्रपटातून बॉलिवूमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 80 ते 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये श्रीदेवीची जादू होती. या काळात फक्त हिरोइन नाही तर हिरोंनाही इनसिक्योर फिल होत असत.

1967 मध्ये आलेल्या 'थुनाइवन' या तामिळ चित्रपटात श्रीदेवी भगवान मुरुगाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. तेव्हा त्या केवळ 4 वर्षांच्या होत्या.
1967 मध्ये आलेल्या 'थुनाइवन' या तामिळ चित्रपटात श्रीदेवी भगवान मुरुगाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. तेव्हा त्या केवळ 4 वर्षांच्या होत्या.

300 चित्रपटांमध्ये केला होता अभिनय
आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये श्रीदेवी यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. यापैकी 63 हिंदी, 62 तेलगू, 58 तामिळ आणि 21 मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे. लग्नानंतर श्रीदेवी यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. मात्र जवळजवळ 15 वर्षांनी गौरी शिंदे दिग्दर्शित 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाद्वारे त्यांनी फिल्मी दुनियेत कमबॅक केले. श्रीदेवी यांना सिनेसृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय 'चालबाज' आणि 'लम्हें' या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला.

'सोलहवां सावन'द्वारे केला होता बॉलिवूड डेब्यू
श्रीदेवी यांनी 1979मध्ये रिलीज झालेल्या 'सोलहवां सावन' या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. त्यामुळे त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत परतल्या. मात्र 1983 मध्ये 'हिम्मतवाला' या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदीत कमबॅक केले आणि हिंदीतील आघाडीची अभिनेत्री ठरल्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्यांच्यासह बॉलिवूडचे जंपिंग जॅक अर्थातच जितेंद्र मुख्य भूमिकेत होते.

श्रीदेवी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1979 मध्ये आलेल्या 'सोलहवां सावन'द्वारे केली होती.
श्रीदेवी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1979 मध्ये आलेल्या 'सोलहवां सावन'द्वारे केली होती.

नगीना, मिस्टर इंडिया आणि चालबाज, प्रत्येक चित्रपटांमध्ये हटके अंदाज
1986 मध्ये रिलीज झालेला 'नगीना' हा चित्रपट श्रीदेवी यांच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. या चित्रपटात त्यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील 'मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा...' या गाण्यात श्रीदेवी यांनी आपल्या अद्भूत नृत्यशैलीचे दर्शन घडवले. खरं तर नाग-नागिण या फँटसीवर अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार झाले. मात्र कोणत्याच चित्रपटाला 'नगीना'सारखे यश मिळू शकलेले नाही. 1987 मध्ये श्रीदेवी यांनी आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट बॉलिवूडला दिला. या सिनेमाचे नाव होते 'मिस्टर इंडिया'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्यानंतर 1989 मध्ये श्रीदेवी यांच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा चित्रपट रिलीज झाला. तो होता 'चालबाज'. यात श्रीदेवी यांनी जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती.

103 डिग्री तापामध्ये शूट केले होते गाणे
कामाप्रती समर्पणाच्या बाबतीत श्रीदेवी इतर अभिनेत्रींपेक्षा नेहमीच पुढे होत्या. वडिलांच्या निधनाच्या वेळी त्या लंडनमध्ये शूटिंग करत होत्या. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच त्या भारतात परतल्या आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच लंडनला जाऊन शूटिंगला सुरुवात केली होती. याशिवाय 'चालबाज'च्या शूटिंगदरम्यान त्यांना 103 डिग्री ताप आला होता, मात्र त्यांनी आराम न करता गाण्याचे शूटिंग उत्साहात पूर्ण केले होते.

1 कोटी फिस घेणा-या पहिल्या अभिनेत्री होत्या श्रीदेवी
बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा जास्त पैसे मिळतात. परंतू 80 आणि 90 च्या दशकात प्रोड्यूसर-डाययेक्टर श्रीदेवी यांना फिल्म हिट करण्याचा सर्वात मोठा फॉर्म्यूला मानत होते. याच कारणांमुळे त्यांची फिस 1 कोटी रुपये होती. त्यांना बॉलिवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टारचा मान मिळाला होता.

श्रीदेवी पहिल्या अशा अभिनेत्री होत्या, ज्यांना मानधन म्हणून 1 कोटी रुपये मिळाले होते.
श्रीदेवी पहिल्या अशा अभिनेत्री होत्या, ज्यांना मानधन म्हणून 1 कोटी रुपये मिळाले होते.

आईने 10 लाख फीस मागितली, बोनी यांनी 11 लाखात मुलीला साइन केले होते
श्रीदेवी यांना बोनी कपूर यांनी 70 च्या दशकात एका तामिळ चित्रपटात पाहिले होते. बोनी पहिल्याच नजरेत त्यांच्या प्रेमात पडले होते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची स्टोरी मिस्टर इंडिया या चित्रपटापासून सुरू झाली. श्रीदेवी यांनी बोनी यांना स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी 10 दिवस थांबायला लावले. श्रीदेवीला साइन करण्यासाठी त्यांच्या आईने बोनी कपूर यांच्याकडे 10 लाख फीस सांगितली होती. मात्र बोनी म्हणाले की, मी तुम्हाला 11 लाख देईन.

एका मुलाखतीत सलमानने स्वतः सांगितले होते की, श्रीदेवीसोबत काम करायला तो घाबरत होता.
एका मुलाखतीत सलमानने स्वतः सांगितले होते की, श्रीदेवीसोबत काम करायला तो घाबरत होता.

सलमानला श्रीदेवीकडून इनसिक्योर वाटत होते
आज बॉलिवूडमध्ये सलमान राज्य करतो. परंतू एक काळ असा होता, जेव्हा सलमानला श्रीदेवी यांच्यासोबत काम करायची भीती वाटायची. एका मुलाखतीत सलमानने हे स्पष्ट केले होते. यामागचे कारण म्हणजे, ज्या चित्रपटात श्रीदेवी असायच्या, त्यामध्ये प्रेक्षक हे दुस-या कलाकाराला महत्त्व देत नव्हते. श्रीदेवी यांनी सलमानसोबत 'चंद्रमुखी' आणि 'चांद का टुकडा' सारख्या चित्रपटात काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...