आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्या भारती बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:जाणून घ्या दिव्याच्या अकाली निधनानंतर अर्धवट राहिलेल्या चित्रपटांचे काय झाले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या छोट्याशा करिअरमध्ये दिव्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते.

अभिनेत्री दिव्या भारती हिची आज 47 वी जयंती आहे. 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईतील एका मध्यवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला होता. दिव्‍याने करिअरची सुरुवात तेलुगु चित्रपट 'बोबली राजा' द्वारे केली होती. 1992 मध्‍ये बॉलिवूडमध्ये 'विश्वात्मा' या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिच्यावर चित्रीत झालेले 'सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई' हे गाणे खूप गाजले होते. 1992 ते 1993 या एका वर्षात दिव्‍या भारतीने 14 बॉलिवूड चित्रपटात काम केले. 'दिवाना या चित्रपटासाठी उत्‍कृष्‍ट अभिनेत्री म्‍हणून दिव्‍याला फिल्‍मफेअर अवॉर्ड मिळाला होता. मात्र 5 एप्रिल 1993 रोजी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

आपल्या छोट्याशा करिअरमध्ये दिव्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. सलग तीन आठवड्यात तिचे तीन चित्रपट रिलीज झाले होते. एखाद्या अभिनेत्रीचे तीन आठवड्यात तीन चित्रपट रिलीज होण्याची ती पहिलीच वेळ होता. दिव्याला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्माते-दिग्दर्शक उत्सुक असायचे. तिने अनेक चित्रपट साइन केले होते. पण तिच्या आकस्मिक मृत्यूनंतर तिच्या अनेक अर्धवट राहिलेल्या चित्रपटांचे नेमके काय झाले, हे आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.

रविना टंडन आणि श्रीदेवी यांनी केले दिव्या भारतीच्या चित्रपटांत काम

दिव्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. निधनापुर्वी दिव्याने 3 चित्रपटांचे 20-20 टक्‍के शूटिंग पूर्ण केले होते. मात्र त्याचकाळात तिचे निधन झाले. त्यामुळे निर्मात्यांना दुस-या अभिनेत्रींसोबत ते चित्रपट पूर्ण करावे लागले. ते चित्रपट होते 'लाडला', मोहरा आणि 'कर्तव्य'. 'लाडला'मध्ये श्रीदेवीने दिव्याची जागा घेतली.

तर 'मोहरा' या चित्रपटात रवीना टंडनची वर्णी लागली होती. 'कर्तव्य'मध्ये जुही चावलाने नंतर मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटांचे 20 टक्‍केच शूटिंग पूर्ण झाल्‍यामूळे निर्मात्यांना जास्‍त आर्थिक नुकसान सहन करावे लागले नाही.

दिव्‍या भारतीचा मृत्‍यू झाला तेव्‍हा 'रंग' या चित्रपटातील एका गाण्‍याचे शूटिंग बाकी होते. कमल सदनाहसोबत एक डुप्‍लीकेट डान्‍सर घेऊन कॅमेराचा चलाखीने वापर करत ते शूटिंग पूर्ण करण्‍यात आले होते.

सेटवर सर्वांसमोर सिगारेट ओढायची दिव्या भारती
दिव्‍या भारतीचा मृत्‍यू पूर्ण सिनेक्षेत्राला एक मोठा धक्‍का होता. ती झपाटयाने लोकप्रियतेच्‍या शिखरावर पाहोचली होती. यासोबतच ती बोल्‍डही होती. 'बलवान' सिनेमाच्‍या सेटवर शॉट पूर्ण होताच ती
सर्वांदेखत सिगरेट पित असे. 25 वर्षांपूर्वी एखाद्या अभिनेत्रीचे अशा पध्‍दतीने सिगारेट पिणे ही साधी गोष्‍ट नव्‍हती.

बातम्या आणखी आहेत...