आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीदेवीची तिसरी पुण्यतिथी:1 कोटी मानधन घेणा-या पहिल्या अभिनेत्री होत्या श्रीदेवी, स्टारडम एवढे होते की सलमानलाही वाटायची भीती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 80 ते 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये श्रीदेवीची जादू होती.

अभिनेत्री श्रीदेवी यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत त्यांचे निधन झाले होते. 'सदमा' या चित्रपटात स्मृतीभ्रंश झालेल्या तरुणीची भूमिका असो, किंवा 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात 'हवाहवाई...' गाण्यावर थिरकून प्रेक्षकांना भूरळ घालणारी मनमौजी तरुणी असो, श्रीदेवी यांनी सिल्व्हर स्क्रिनवर साकारलेल्या आपल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . श्रीदेवी या अशा एक अभिनेत्री होत्या, ज्यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या दिलेखचक अदा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.

श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट, 1963 मध्ये तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात झाला होता. त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली. 1976 मध्ये त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर 'मुंदरु मुदिची' या तामिळ चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत काम करायला हिरोइन नाही तर हिरोही घाबरत असत.

बॉलिवूडमध्ये त्यांनी 1979 मध्ये 'सोलहवां सावन' या चित्रपटातून पदार्पण केले. परंतू हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. 1983 मध्ये श्रीदेवीने 'हिम्मतवाला' या चित्रपटातून बॉलिवूमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 80 ते 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये श्रीदेवीची जादू होती. या काळात फक्त हिरोइन नाही तर हिरोंनाही इनसिक्योर फिल होत असत.

आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये श्रीदेवी यांनी 300 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. यापैकी 63 हिंदी, 62 तेलगू, 58 तामिळ आणि 21 मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे. लग्नानंतर श्रीदेवी यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. मात्र जवळजवळ 15 वर्षांनी गौरी शिंदे दिग्दर्शित 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाद्वारे त्यांनी फिल्मी दुनियेत कमबॅक केले. श्रीदेवी यांना सिनेसृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय चालबाज आणि लम्हें या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला.

'सोलहवां सावन'द्वारे केले होते बॉलिवूड डेब्यू
श्रीदेवी यांनी 1979मध्ये रिलीज झालेल्या 'सोलहवां सावन' या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. त्यामुळे त्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत परतल्या. मात्र 1983 मध्ये 'हिम्मतवाला' या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदीत कमबॅक केले आणि हिंदीतील आघाडीची अभिनेत्री ठरल्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्यांच्यासह बॉलिवूडचे जंपिंग जॅक अर्थातच जितेंद्र मुख्य भूमिकेत होते.

नगीना, मिस्टर इंडिया आणि चालबाज, प्रत्येक सिनेमांमध्ये हटके अंदाज
1986 मध्ये रिलीज झालेला 'नगीना' हा सिनेमा श्रीदेवी यांच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. या चित्रपटात त्यांनी इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील 'मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा...' या गाण्यात श्रीदेवीने आपल्या अद्भूत नृत्यशैलीचे दर्शन घडवले. खरं तर नाग-नागिण या फँटसीवर अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये तयार झाले. मात्र कोणत्याच चित्रपटाला 'नगीना'सारखे यश मिळू शकलेले नाही. 1987 मध्ये श्रीदेवी यांनी आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा बॉलिवूडला दिला. या सिनेमाचे नाव होते 'मिस्टर इंडिया'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्यानंतर 1989 मध्ये श्रीदेवी यांच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा सिनेमा रिलीज झाला. तो होता 'चालबाज'. यात श्रीदेवी यांनी जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती.

1 कोटी फिस घेणा-या पहिल्या अभिनेत्री होत्या श्रीदेवी
बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा जास्त पैसे मिळतात. परंतू 80 आणि 90 च्या दशकात प्रोड्यूसर-डाययेक्टर श्रीदेवी यांना फिल्म हिट करण्याचा सर्वात मोठा फॉर्म्यूला मानत होते. याच कारणांमुळे त्यांची फिस 1 कोटी रुपये होती.

सलमानला श्रीदेवीकडून इनसिक्योर वाटत होते
आज बॉलिवूडमध्ये सलमान राज्य करतो. परंतू एक काळ असा होता, जेव्हा सलमानला श्रीदेवीसोबत काम करायची भीती वाटायची. एका मुलाखतीत सलमानने हे स्पष्ट केले होते. यामागचे कारण म्हणजे, ज्या चित्रपटात श्रीदेवी असायची, त्यामध्ये प्रेक्षक हे दुस-या कलाकाराला महत्त्व देत नव्हते. श्रीदेवी यांनी सलमानसोबत 'चंद्रमुखी' आणि 'चांद का टुकडा' सारख्या चित्रपटात काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...