आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम्या कृष्णनचा वाढदिवस:बाहुबलीची आई शिवगामीच्या भूमिकेसाठी श्रीदेवीला होती पहिली पसंती, 6 कोटी मानधन मागितल्याने दिग्दर्शकाने राम्याला केले होते साइन

एका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बाहुबली 2' साठी 2.5 कोटी रुपये घेणाऱ्या राम्याकडे सुमारे 40 कोटींची संपत्ती आहे.

'बाहुबली' या गाजलेल्या चित्रपटात शिवगामीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रम्या कृष्णन हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. राम्याचा जन्म 15 सप्टेंबर 1970 रोजी चेन्नई येथे झाला. तिने 12 जून 2003 रोजी तेलुगू चित्रपट निर्माता कृष्णा वामसी यांच्याशी लग्न केले. 13 फेब्रुवारी 2004 रोजी राम्याने मुलगा ऋत्विकला जन्म दिला. तो आता 17 वर्षांचा आहे. 'बाहुबली 2' साठी 2.5 कोटी रुपये घेणाऱ्या राम्याकडे सुमारे 40 कोटींची संपत्ती आहे.

सव्वा कोटीच्या कारमधून प्रवास करते राम्या
राम्याकडे मर्सिडीज बेंज एस 350 कार आहे, ज्याची किंमत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये आहे. राम्या सध्या तिच्या कुटुंबासह चेन्नईतील इंजबक्कम येथे वास्तव्याला आहे. येथे तिचा बंगला आहे. 2012
मध्ये तिच्या घरी काम करणा-या एका महिलेने तिच्या घरातून सुमारे 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले होते.

राम्याला असा मिळाला होता बाहुबली चित्रपट
अभिनेत्री रम्या कृष्णनने साकारलेली राजमाता शिवगामीसुद्धा चित्रपटातील आकर्षणाचा विषय ठरली. पण, मुळात या भूमिकेचा प्रस्ताव सर्वप्रथम श्रीदेवी यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. शिवगामीची
भूमिका साकारण्यासाठी श्रीदेवी यांनी घसघशीत मानधनाची मागणी केली होती. श्रीदेवी यांनी या चित्रपटासाठी सुमारे सहा कोटी रुपये आणि हॉटेलवर एक संपूर्ण फ्लोअरची मागणी केली होती. याशिवाय
त्यांनी मुंबई ते हैदराबाद बिझनेस क्लासचे तिकिट प्रवासासाठी मागितले होते. त्यामुळेच ही भूमिका नंतर राम्या कृष्णनला देण्यात आली होती.

'बाहुबली'च्या एका दृश्यात राम्या.
'बाहुबली'च्या एका दृश्यात राम्या.

आधीच चित्रपटाचे बजेट खूप जास्त होते. त्यामुळे श्रीदेवी यांनी मागितलेले मानधन चित्रपटाच्या निर्मात्यांना देणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत दिग्दर्शक राजामौली यांनी श्रीदेवीऐवजी राम्या कृष्णनशी चर्चा केली. शेवटी राम्या या चित्रपटात काम करण्यास तयार झाली आणि तिने त्यासाठी 2.5 कोटी घेतले होते.

बातम्या आणखी आहेत...