आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीदेवीची पुण्यतिथी:'मोहरा', 'डर', 'बेटा'पासून ते 'दिल तो पागल है', 'बाजीगर'पर्यंत, श्रीदेवीने नाकारलेल्या भूमिकांनी सुपरस्टार झाल्या रवीना-माधुरीसह या अभिनेत्री

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या, श्रीदेवी यांनी नाकारलेल्या चित्रपटांविषयी...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. दुबईत हार्ट अटॅकमुळे त्यांचे निधन झाले होते. श्रीदेवी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशीसोबत त्यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईला गेल्या होत्या. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणा-या श्रीदेवीची अकाली एक्झिट संपूर्ण देशाला चटका लावून गेली. 2017 मध्ये श्रीदेवी यांच्या फिल्मी करिअरला 50 वर्षे पूर्ण झाली होती. 13 ऑगस्च 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाशी येथे जन्मलेल्या श्रीदेवी यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? श्रीदेवीने नाकारलेले चित्रपट नंतर माधुरी आणि रवीनासह अनेक अभिनेत्रींनी स्वीकारले आणि त्या सुपरस्टार बनल्या.

 • मोहरा (1994)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : रवीना टंडन​​​​​​​

​​​​​​​दिग्दर्शक राजीव राय यांच्या मोहरा या चित्रपटासाठी श्रीदेवीला पहिली पसंती होती. पण श्रीदेवी यांनी हा चित्रपट नाकारला. त्यानंतर दिव्या भारतीला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात दिव्या भारतीचा मृत्यू झाला. त्यानंतर रवीना टंडनला घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्यात आला. चित्रपट हिट ठरला आणि रवीना टंडन सुपरस्टार झाली.

 • दिल तो पागल है (1997)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : माधुरी दीक्षित

यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटातील माधुरीने साकारलेली भूमिका श्रीदेवीला ऑफर झाली होती. पण श्रीदेवीने चित्रपट नाकारला आणि ही भूमिका माधुरीला मिळाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

 • बाजीगर (1993)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : काजोल आणि शिल्पा शेट्टी

​​​​​​​

बाजीगर या चित्रपटात श्रीदेवी यांनी दुहेरी व्यक्तिरेखा साकारावी, अशी अब्बास मस्तान यांची इच्छा होती. तशी विचारणादेखील त्यांनी श्रीदेवी यांना केली होती. पण नंतर अब्बास मस्तान यांनी स्क्रिप्टमध्ये काही बदल केले आणि दोन बहिणींच्या भूमिकेसाठी काजोल आणि शिल्पा शेट्टीला फायनल केले. असे म्हटले जाते, की श्रीदेवी यांनी चित्रपटाला होकारही दिला नव्हता, किंवा नाही देखील म्हटले नव्हते. पण अब्बास मस्तान यांनी स्क्रिप्टमध्ये बदल करण्यापूर्वी श्रीदेवी यांच्याशी चर्चा नक्की केली होती.

 • डर (1993)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : जूही चावला​​​​​​​

यश चोप्रांनी किरणची भूमिका सर्वप्रथम श्रीदेवी यांना ऑफर केली होती. पण भूमिका पसंत न पडल्याने श्रीदेवी यांनी यश चोप्रांना नाही म्हटले होते. इतकेच नाही तर शाहरुख खानची भूमिका मिळाली असती तर चित्रपट नक्की केला असता, असे श्रीदेवी म्हणाल्या होत्या, असे म्हटले जाते. याकाळात जूही चावला श्रीदेवीची कॉपी करत असल्याचा आरोप तिच्यावर लागला होता. 'टूट गई टूटकर मैं चूर हो गई' में, या गाण्यात जूहीने 'चांदनी' या चित्रपटात श्रीदेवी यांनी परिधान केलेल्या कॉश्च्युमसारखा ड्रेस परिधान केला होता. याविषयी यश चोप्रा म्हणाले होते, की ते चित्रपटात जूहीला चांदनी लूकमध्ये बघू इच्छित होते.

 • अंजाम (1994)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : माधुरी दीक्षित

राहुल रवैल दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानक अभिनेत्री रेखाला डोळ्यासमोर ठेऊन लिहिण्यात आले होते. पण नंतर काही कारणास्तव रेखाऐवजी श्रीदेवीला चित्रपटासाठी विचारणा झाली. श्रीदेवी यांनी भूमिका नाकारल्यानंतर हा चित्रपट शाहरुख खान आणि दीपक तिजोरीसोबत माधुरी दीक्षितला घेऊन पूर्ण करण्यात आला होता.

 • अजूबा (1991)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : डिंपल कपाडिया​​​​​​​​​​​​​​

या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते शशी कपूर अमिताभ बच्चनसह श्रीदेवीला चित्रपटात कास्ट करु इच्छित होते. पण श्रीदेवी यांना भूमिका पसंत पडली नाही. असेही म्हटले जाते, की त्याकाळात श्रीदेवी यांनी प्रत्येक त्या चित्रपटाला नकार दिला, ज्यात त्यांची भूमिका अमिताभ यांच्या तोडीची नव्हती.

 • बेटा (1992)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : माधुरी दीक्षित

दिग्दर्शक आणि निर्माते इंद्र कुमार यांनी 'बेटा' या चित्रपटातील अनिल कपूरच्या अपोझिट असलेली भूमिका श्रीदेवीला डोळ्यासमोर ठेऊन लिहिली होती. पण श्रीदेवी यांना त्यांच्या हातात असलेले पूर्वीचे प्रोजेक्ट पूर्ण करायचे होते. शिवाय त्यांनी अनिल कपूरसोबत बरेच चित्रपट केले होते. या दोन कारणांमुळे श्रीदेवी यांनी ही भूमिका नाकारली आणि नंतर माधुरी दीक्षितची वर्णी या चित्रपटात लागली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

 • युगपुरुष (1998)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : मनीषा कोइराला​​​​​​​

पार्थो घोष दिग्दर्शित या चित्रपटात श्रीदेवी प्रॉस्टिट्यूटची भूमिका करण्यासाठी तयार झाल्या होत्या. त्याकाळी आपल्या आवडत्या अभिनेत्रीसोबत काम करणार असल्याचे नानांनी सगळ्यांना सांगितले होते. पण नंतर या भूमिकेला आपण न्याय देऊ शकणार नाही, हे कारण सांगून श्रीदेवी यांनी ही भूमिका नाकारली होती. त्याकाळी अशी चर्चा होती, की बोनी कपूर यांच्या सांगण्यावरुन श्रीदेवी यांनी हा चित्रपट सोडला होता. असे म्हटले जाते, की 'वजूद' या चित्रपटाच्या सेटवर नाना आणि अनिल कपूर यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे अनिल आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवीला हा चित्रपट सोडण्यासाठी कन्विन्स केले होते. नंतर मनीषा कोइरालाने ही भूमिका साकारली होती.

 • आइना (1993)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : जूही चावला​​​​​​​

यश चोप्रांच्या या चित्रपटात जूही चावलाच श्रीदेवीची रिप्लेसमेंट बनली. असे म्हटले जाते, की श्रीदेवीला या चित्रपटातील भूमिका पसंत पडली नव्हती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

 • जांबाज (1986)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : डिंपल कपाडिया​​​​​​​​​​​​​​

फिरोज खान यांनी हा चित्रपट बनवला होता. यामध्ये ते श्रीदेवी यांना लीड रोलमध्ये घेऊ इच्छित होते. पण चित्रपटात अंगप्रदर्शन जास्त असल्याने श्रीदेवी यांनी भूमिका नाकारली होती. नंतर श्रीदेवी यांनी सीमा ही व्यक्तीरेखा साकारली आणि त्यांच्यावर चित्रीत झालेले 'हर किसी को नहीं मिलता यहां प्यार जिंदगी में' हे गाणे सुपरहिट ठरले होते.

 • फिल्म : कामयाब (1984)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : साऊथ अॅक्ट्रेस राधा

या चित्रपटाची निर्मिती पद्मालय प्रॉडक्शनने केली होती. श्रीदेवी या चित्रपटात छोटी भूमिका साकारु इच्छित नव्हत्या. त्यामुळे त्यांनी चित्रपटाला नकार दिला. त्यामुळे प्रॉडक्शन हाऊस त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यावेळी भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच जी अभिनेत्री चित्रपटात नाही, तिचे नाव चक्क पोस्टरवर बघायला मिळाले होते. मुव्हीच्या पोस्टरवर दाक्षिणात्य अभिनेत्री राधाचा चेहरा दिसला होता आणि त्यावर लिहिण्यात आले होते. 'She’s not Sridevi. She’s Radha'. यावर श्रीदेवी यांच्या आई अतिशय नाराज झाल्या होत्या. त्यांनी आक्षेप नोंदवत म्हटले होते, की राधा स्वतः एक मोठी अभिनेत्री असताना, तिने माझ्या मुलीच्या नावाचा वापर का केला.

 • होशियार (1985)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : मीनाक्षी शेषाद्री​​​​​​​​​​​​​​

हा चित्रपटसुद्धा पद्मालय स्टुडिओच्या बॅनरमध्ये तयार झाला होता. असे म्हटले जाते, की श्रीदेवी यांच्या आईने त्यांना हा चित्रपट स्वीकारण्यापासून रोखले होते. कारण 'कामयाब' या चित्रपटाच्या पोस्टरवर श्रीदेवी यांच्या नावाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे श्रीदेवी यांच्या आई पद्मालय प्रॉडक्शनवर चांगल्याच नाराज झाल्या होत्या. 'होशियार' बॉक्सऑफिसवर हिट ठरला. पण मीनाक्षीवर तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे बरीच टीका झाली होती. तिच्यावर श्रीदेवीची कॉपी केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

 • खुदगर्ज (1987)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : भानू प्रिया

हा चित्रपट राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. जितेंद्र यांच्या अपोझिट ते श्रीदेवीला लीड रोलमध्ये घेऊ इच्छित होते. पण भूमिकेची लांबी कमी असल्याने श्रीदेवी यांनी ही ऑफर नाकारली होती. भानू प्रियाला ही भूमिका करण्याची संधी मिळाली. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, अनेक चित्रपटांमध्ये श्रीदेवीसाठी डबिंग करणार-या नाजने या चित्रपटात भानू प्रियासाठी डबिंग केले होते. हा चित्रपट हिट ठरला होता. पण चित्रपटाच्या यशाचा फायदा भानू प्रियाच्या करिअरला फारसा झाला नाही.

 • विजय (1988)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : मीनाक्षी शेषाद्री​​​​​​​

यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाला श्रीदेवी यांनी रिजेक्ट केले होते. कारण त्याकाळात श्रीदेवी मल्टिस्टारर चित्रपटात काम करु इच्छित नव्हत्या. या चित्रपटात अनिल कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना, हेमा मालिनी आणि सनम यांची मुख्य भूमिका होती.

 • अभिमन्यु (1989)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : किमी काटकर​​​​​​​

श्रीदेवी यांनी हा चित्रपट साइन केला होता. पण रिव्हिलिंग सीन्स आणि 'अभिमन्यु', 'चांदनी' या चित्रपटांच्या डेट क्लॅशमुळे दिग्दर्शक टोनी जुनेजासोबत त्यांचे मतभेद झाले होते. यावरुन त्या चित्रपटाच्या बाहेर पडल्या. नंतर अनिल कपूरच्या अपोझिट किमी काटकरला लीड रोलमध्ये साइन करण्यात आले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अॅव्हरेज राहिला होता.

 • 'सच्चे का बोलबाला' (1989)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : मीनाक्षी शेषाद्री​​​​​​​

या चित्रपटात श्रीदेवी यांनी काम करावे, अशी देव आनंद यांची इच्छा होती. पण देव साहेबांनी एक्स्ट्रा वेळ देण्याची विनंती केल्याने श्रीदेवीने हा चित्रपट नाकारला. त्याकाळात श्रीदेवी त्यांच्या इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी होत्या. त्यामुळे त्यांना देव साहेबांच्या चित्रपटासाठी अधिकचा वेळ देणे शक्य नव्हते. त्यामुळे देव आनंद यांनी मीनाक्षीला घेऊन हा चित्रपट बनवला, पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

 • लेकिन (1991)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : डिंपल कपाड़िया​​​​​​​

या चित्रपटाचे दिग्दर्शक गुलजार आणि निर्मात्या लता मंगेशकर होत्या. श्रीदेवी यांनी या चित्रपटात काम करावे, अशी लता यांची इच्छा होती. पण श्रीदेवीने हा चित्रपट नाकारला होता. कारण त्याच काळात श्रीदेवी यांच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्या कोणतेही नवीन प्रोजेक्ट्स स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. नंतर या चित्रपटातील भूमिका डिंपल कपाडियाने स्वीकारली. असे म्हटले जाते, की श्रीदेवीला ऑफर झालेली भूमिका ही सर्वात इंट्रेस्टिंग भूमिकेपैकी एक होती.

 • कारोबार (2000)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : जूही चावला​​​​​​​

दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या या चित्रपटाची ऑफर श्रीदेवी यांनी अधिक अंगप्रदर्शन करावे लागणार असल्याने नाकारली होती. चित्रपटातील एका दृश्यात श्रीदेवी यांना स्वीमसूट परिधान करावा लागणार होता. त्यासाठी त्या तयार नव्हत्या. अखेर श्रीदेवी यांनी चित्रपट रिजेक्ट केला. नंतर ही भूमिका जूही चावलाला ऑफर झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

 • मोहब्बतें (2000)
 • श्रीदेवीऐवजी कोण झळकले : NA

यश चोप्रांच्या या चित्रपटात श्रीदेवी नेमकी कुठली भूमिका साकारणार होत्या, हे कधीच उघड करण्यात आले नाही. जेव्हा श्रीदेवी यांनी त्यांना ऑफर झालेली भूमिका नाकारली, तेव्हा यश चोप्रांनी तो रोलच स्क्रिप्टमधून काढून टाकला. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय स्टारर हा चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

बातम्या आणखी आहेत...