आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर अवॉर्ड्समध्ये राजामौलींचा अपमान?:कार्यक्रमात दिली मागची खुर्ची, संतापलेले चाहते म्हणाले – बॅक बेंचर्सच विजेते होतात

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक एसएस राजामौलींच्या आरआरआर या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर सर्वात मोठ्या व्यासपीठावर भारताचा झेंडा फडकला.

मात्र, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याबद्दल भारतीय चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. खरं तर, कार्यक्रमादरम्यान आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांच्या कुटुंबाला सर्वात मागची सीट देण्यात आली होती. यावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकांनी अकादमीला सुनावले खडे बोल
हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी ऑस्कर सोहळ्याच्या आयोजकांना आसन व्यवस्थेवरुन फटकारले आहे. लोक म्हणतात की, ज्या चित्रपटाच्या गाण्याने ऑस्कर जिंकला आहे त्या चित्रपटाच्या टीमला शेवटच्या रांगेत बसवणे हा त्यांचा अनादर आहे.

यूजर्स म्हणाले की, अकादमीला माहित होते की पुरस्कार कोण जिंकणार आहे, तरीही त्यांनी आरआरआरच्या टीमला शेवटच्या रांगेत जागा दिली आहे, ही खरोखरच विचार करण्याची बाब आहे.

चाहते म्हणाले - फक्त बॅक बेंचर्सच विजेते होतात
सोशल मीडियावर यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, "आयोजकांनी त्यांना (राजामौली) एक्झिट सीटवर बसवले, मी पैज लावतो की पुढच्या चित्रपटानंतर त्यांना पुढच्या सीटवर बसण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही."

आणखी एका यूजरने लिहिले की, 'जो शेवटच्या बेंचवर बसतो तो विजेता बनतो.'

RRR ला बॉलिवूड चित्रपट म्हटल्याने झाला विरोध
याशिवाय आणखी एक वाद निर्माण झाला आहे. खरं तर, ऑस्करचे आयोजन करणारे कॉमेडियन आणि टेलिव्हिजन होस्ट जिमी किमेल यांनी कार्यक्रमादरम्यान आरआरआरला बॉलिवूड चित्रपट म्हटले. मुळात तेलुगूमध्ये बनलेल्या या चित्रपटाला बॉलिवूड म्हटल्याने चाहते प्रचंड संतापले. एसएस राजामौली यांनी स्वतः सांगितले की RRR हा तेलुगु चित्रपट आहे.

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा बोलबाला
यंदा 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारत आणि बॉलिवूडचा बोलबाला होता. RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला तर द एलिफंट व्हिस्परर्सने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जिंकला.

ऑस्करमध्ये भारताला एकूण तीन नामांकने मिळाली होती. नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार एमएम किरवानी पुरस्कार जिंकल्यानंतर भावूक झाले होते. प्रत्येक भारतीय आरआरआरने ऑस्कर जिंकावा अशी प्रार्थना करत असल्याचे ते म्हणाले.

ऑस्कर जिंक​​​​​​​णारे पहिले भारतीय गाणे
नाटू-नाटूला ऑस्कर मिळणे अनेक अर्थांनी खास आहे. कारण ए.आर. रहमान यांना 2008 मध्ये 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील 'जय हो' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर मिळाला होता. 15 वर्षांनंतर भारताला हा पुरस्कार मिळाला आहे. 'जय हो' या गाण्याला ऑस्कर मिळाला, पण तो ब्रिटिश चित्रपट होता.

अशा परिस्थितीत 'नातू-नातू' हे ऑस्कर मिळवणारे पहिलेच गाणे आहे, जे भारतीय चित्रपटातील आहे. हे ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...