आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RRR:राजामौलींच्या चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक आउट, मोशन पोस्टर बघून नेटक-यांनी केली 'बाहुबली'च्या सस्पेन्ससोबत तुलना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोस्टर पाहिल्यानंतर लोक अजयच्या लूकचे कौतुक करत आहेत.

अभिनेता अजय देवगण आज (2 एप्रिल) आपला वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याने आपल्या चाहत्यांना एक मोठे रिटर्न गिफ्ट दिले आहे. एस.एस. राजामौली यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘RRR’ या चित्रपटातील अजय देवगणचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. राजामौली यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करत अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओत अजय देवगण शॉल ओढून एका युद्धाच्या मैदानावर उभा दिसतोय. बॅकग्राउंडमध्ये लोड एम शूट हे शब्द ऐकू येत आहेत. व्हिडिओच्या शेवटी अजय अंगावरील शॉल काढत समोर येताना दिसतोय.

पोस्टर पाहिल्यानंतर लोक अजयच्या लूकचे कौतुक करत आहेत. पण सोबतच याची तुलना 'बाहुबली'च्या पहिल्या भागात 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या सस्पेन्ससोबत करत आहेत. पोस्टर बघून एका नेटक-याने लिहिले, "कटप्पाने बाहुबलीला का मारले? यानंतर आता अजयला गोळी घातली जाईल का? तो स्वतःला कसा वाचवेल?," असा प्रश्न विचारला आहे. तर एका नेटक-याने लिहिले, "अजय सरांचा दमदार लुक. अजय देवगण सरांचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत," असे म्हटले आहे.

अजय देवगणचा पहिला तेलुगू चित्रपट

'आरआरआर' हा अजय देवगणचा पहिला तेलुगू चित्रपट आहे. मात्र राजामौलींनी चित्रपटातील अजयच्या पात्राच्या नावाविषयी अद्याप कोणताही खुलासा केला नाही. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि श्रिया सरन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अलीकडेच म्हणजे 16 मार्च रोजी आलिया भट्टच्या वाढदिवशी तिचादेखील चित्रपटातील फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला होता. या चित्रपटात आलिया सीतेची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा 1920 च्या दशकातील क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीमा यांच्या जीवनावर आधारित आहे.

475 कोटींमध्ये विकले 'आरआरआर'चे उत्तर भारताचे हक्क

यावर्षी दस-याला रिलीज होणा-या 'आरआरआर'चे नॉर्थ इंडिया राइट्स 475 कोटींमध्ये विकले गेले आहेत. पेन स्टुडिओजचे प्रमुख जयंतीलाल गडा यांनी ते विकत घेतले आहेत. जयंतीलाल गडा याला उत्तर भारत आणि हिंदीच्या परदेशी बाजारात रिलीज करणार आहेत. दिव्य मराठीसोबत झालेल्या मुलाखतीत गडा यांनी सांगितले, हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. व्यापार मंडळात जी रक्कम सांगितली जात आहे, आम्ही त्याच्या समान प्रमाणात त्याचे हक्क विकत घेतले आहेत. हा करार माझ्यात आणि राजामौलींमध्ये झाला आहे.'

पाच हजारांहून अधिक स्क्रिनवर प्रदर्शित होणार चित्रपट
गडा यांनी पुढे सांगितले, 'तांत्रिकदृष्ट्या माझ्याकडे परदेशातील बाजाराव्यतिरिक्त थिएटर, इलेक्ट्रॉनिक्स, उपग्रह आणि उत्तर भारताचे डिजिटल अधिकार आहेत, तर सध्या दक्षिणेचे लोकल टेरिटरी राजामौलींजवळ आहेत. हा चित्रपट दस-याला पाच हजारांहून अधिक स्क्रिनवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक लार्जर दॅन लाइफच्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रकारचे चित्रपट त्यांना थिएटरमध्ये परत आणू शकतात. तोपर्यंत कोरोना आटोक्यात येईल, नाही झाला तरी आम्ही ते डिजिटलवर रिलीज करणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...