आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिग्दर्शक एस.एस. राजामौलींच्या बहुप्रतिक्षित 'आरआरआर' या चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा झाली आहे. दक्षिणेचा सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर स्टारर 'आरआरआर' यावर्षी दस-याच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्टने सोमवारी सोशल मीडियावर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत.
'आरआरआर' 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
आलिया भट्टने हे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, "'आरआरआर'साठी सज्ज व्हा. हा 13 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल." चित्रपटाविषयी बोलताना निर्माता डीव्हीव्ही दानय्या म्हणाले की, “आम्ही 'आरआरआर ’च्या शूटिंग शेड्यूलच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी खूप उत्सुक आहोत. प्रेक्षकांसह सिनेमागृहात दस-यासारखा मोठा उत्सव साजरा करण्यासही आम्ही खूप उत्सुक आहोत."
कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती
डीव्हीव्ही एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. हा चित्रपट 1920 च्या दशकातील क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. हा मल्टीस्टारर पीरियड ड्रामा यापूर्वी 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
450 कोटींच्या बजेटमध्ये बनतोय 'आरआरआर'
'आरआरआर' हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या 5 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. रिपोर्ट्सनुसार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सध्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सचे शूटिंग करत आहेत. 'बाहुबली' सारखी सुपरहिट सीरिज बनवणा-या राजामौलींचा 'आरआरआर' बा चित्रपट तब्बल 450 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.