आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोर ऑफ RRR:एसएस राजामौलींच्या आगामी RRRचा मेकिंग व्हिडिओ आला समोर, भव्य सेटपासून ते जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्सची दिसली झलक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 450 कोटींच्या बजेटमध्ये बनतोय 'आरआरआर'

प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आरआरआर' या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान कलाकार आणि टीमने केलेली प्रचंड मेहनत दिसतेय. राजमौली यांनी या चित्रपटाचा मेकिंगचा व्हिडिओ स्वत: ट्विटरवर शेअर केला आहे. 'आरआरआर चित्रपटाच्या मेकिंगची झलक. आशा करतो व्हिडिओ तुमच्या पसंतीस पडेल,' असे ते म्हणाले आहेत.

या व्हिडिओत कलाकारांपासून ते दिग्दर्शक आणि क्रूपर्यंत सारेजण प्रत्येक सीन उत्कृष्टरित्या चित्रीत करण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत. विशेषतः दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर आपले अॅक्शन सीन्स चित्रीत करण्यात बिझी दिसत आहेत. बिहाइंड द सीन व्हिडिओत ‘बाहुबली’ चित्रपटाप्रमाणेच 'आरआरआर’साठी देखील भव्य सेट तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. राजमौली यांच्यासोबतच चित्रपटातील इतर कलाकारांनीदेखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यासह आलिया भट, अजय देवगण, श्रिया सरन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती
डीव्हीव्ही एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. हा चित्रपट 1920 च्या दशकातील क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. हा मल्टीस्टारर पीरियड ड्रामा यापूर्वी 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता 13 ऑक्टोबर 2021 ही प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

450 कोटींच्या बजेटमध्ये बनतोय 'आरआरआर'
'आरआरआर' हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नडसह 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. रिपोर्ट्सनुसार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीक्वेन्सचे शूटिंग पूर्ण केले आहे. 'बाहुबली' सारखी सुपरहिट सीरिज बनवणा-या राजामौलींचा 'आरआरआर' हा चित्रपट तब्बल 450 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये तयार होत आहे.