आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत प्रकरणी सीबीआयचा दुसरा दिवस:शेजारी राहणाऱ्या महिलेने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली- 'त्या दिवशी सुशांतच्या घरची लाइट लवकर बंदी झाली होती'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचा कुक नीरजची सलग दुसऱ्या दिवसी चौकशी झाली, सीबीआयने शुक्रवारी 40 पानांचे पत्रक जारी केले

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या 16 सदस्यांच्या पथकाचा मुंबईमध्ये तपास सुरू आहे. तपासाच्या दुसऱ्या दिवशी सीबीआयने सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानी आणि कुक नीरज सिंहला घेऊन सुशांतच्या फ्लॅटवर पोहेचली. सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा सीन रिक्रिएट करणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी सकाळी टीमने सिद्धार्थची चौकशी केली. सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थच सर्वात आधी सुशांतच्या रुममध्ये गेला होता. कुक नीरजची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली आहे. शुक्रवारी नीरजची 13 तास चौकशी झाली. तसेच, सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत आणि केशव बचनेरलाही सीबीआयने प्रश्न विचारले आहेत.

तिकडे, सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने खुलासा केला की, '13 जूनच्या रात्री 10 ते 11 दरम्यान सुशांतच्या घरची लाइट बंद झाली होती. पण, ऐरवी सुशांतच्या घरची लाइट सकाळी 4 वाजेपर्यंत सुरुच असायची. मला यात काहीतरी गडबड वाटत आहे.' यापूर्वीच्या म्हटले जात होते की, सुशांतच्या घरी 13 जूनला पार्टी झाली होती.

एम्सची टीम ऑटॉप्सी रिपोर्ट तपासेल

एम्सने सुशांतच्या ऑटॉप्सी रिपोर्टचे परीक्षण करण्यासाठी शुक्रवारी 5 फोरेंसिक एक्सपर्टचे पथक तयार केले आहे. सीबीआयने याप्रकरणी शुक्रवारी एम्सकडून सल्ला मागितला होता. एम्सच्या फोरेंसिंक डिपार्टमेंटचे हेड डॉ. सुधीर गुप्ताने सांगितले की ‘‘सुशांतचा खून झालाय, या अँगलनेही तपास केला जाईल. विसरा चा तपास केला जाईल. सुशांतला डिप्रेशन दूर करण्यासाठी दिल्या गेलेल्या गोळ्यांचे परीक्षण केले जाईल.’’

0