आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SSR डेथ अ‍ॅनिव्हर्सरी:'काय पो छे'चा को-स्टार अमित साधने जागवल्या सुशांतच्या आठवणी, म्हणाला - एसएसआरचा त्याच्या कामाबद्दलचा उत्साह कौतुकास्पद होता

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तो माझ्या आठवणीत कायम राहिल : अमित साध

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज पहिली पुण्यतिथी आहे. सुशांतने 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'काय पो छे' या चित्रपटाद्वारे आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. याच चित्रपटातून अभिनेता राजकुमार राव आणि अमित साध यांनीही बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या तीन मुख्य कलाकारांची मैत्री या चित्रपटात दाखवली गेली होती. सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनी अमित साधने त्याचे स्मरण केले आहे. यासोबतच त्याने 'काय पो छे' या चित्रपटाशी संबंधित आठवणी आणि सुशांतसोबतच्या त्याच्या बाँडिंगबद्दलही सांगितले आहे.

तो माझ्या आठवणीत कायम राहिल : अमित साध
अमित साध म्हणाला, सुशांत आता आपल्यासोबत नाही, हे मनाला पटवून देण्यासाठी अजून काही वेळ लागेल. तो कायमच माझ्या आठवणीत राहिल. त्याने आपल्या मागे बरीच चांगली कामे करुन गेला आहे. तो स्वर्गात कुठेही असला तरी मला विश्वास आहे की तो आनंदी आणि बिझी असेल. मला आशा आहे की त्याचे सुंदर मन त्याने येथे अनुभवलेले दुःख विसरले असेल. तो अतिशय बुद्धिमान आणि ती एक शांत व्यक्ती होता. त्याने आपल्या चाहत्यांसोबत एक खास बाँड शेअर केला होता."

सुशांतचा आपल्या कामाबद्दलचा उत्साह कौतुकास्पद होता
अमित साध पुढे म्हणाला, "सुशांतचा त्याच्या कामाबद्दलचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आणि त्याने तो आपल्या छोट्याशा पण यशस्वी करिअरमध्ये टिकवून ठेवला होता."

'काय पो छे'च्या दिवसांना उजाळा देताना अमित साध म्हणाला, "माझ्या चित्रपट कारकिर्दीतील काही उत्तम आठवणी म्हणजे या चित्रपटाच्या सेटवर घालवलेला वेळ. मला गट्टू (दिग्दर्शक अभिषेक कपूर) चे म्हणणे कायम आठवते. तो म्हणाला होता, तुम्हाला हा अनुभव पुन्हा कधीच मिळणार नाही आणि तो बरोबर होता. आम्ही वेगवेगळे चित्रपट केले, वेगवेगळे अनुभव घेतले, बराच प्रवास केला, पण 'काय पो छे'मध्ये आमच्या तिघांच्या (सुशांत), राजकुमार आणि मी) बाँडिंगमुळे स्पेशल होता. आमची मैत्री निखळ होती. सुशांत त्या नात्याचा प्रकाश आणि उर्जा होता. तो आणि मी एकत्र जिमला गेलो, पुस्तकं आणि चरित्रांवर चर्चा केली. त्याला मार्लन ब्रॅन्डो यांचे पुस्तक 'साँग्स माय मदर टॉट मी' हे खूप आवडायचे. जेव्हा जेव्हा कोणी त्याच्या मृत्यूबद्दल वेगवेगवळे तर्क लढवतात, तेव्हा मी शॉक्ड होतो. एखाद्याने असा कायमचा निरोप घेऊ नये," अशा शब्दांत अमितने सुशांतबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

14 जून 2020 रोजी झाला होता सुशांतचा मृत्यू
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला होता. मुंबई पोलिसांनी प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. मात्र, सुमारे दीड महिन्यानंतर सुशांतचे वडील केके सिंह यांनी सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध पाटण्यात एफआयआर दाखल केला होता. सिंह यांनी रियाविरोधात सुशांतच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि त्याच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा तपास नंतर सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयला सहकार्य करणा-या एम्सने या प्रकरणात
हत्येची शक्यता नाकारून एजन्सीला अहवाल सादर केला आहे. मात्र, सीबीआयचा तपास अद्याप सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...