आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात पसरलेल्या कोरोना संसर्गाचा धडा घेत अमिताभ बच्चन यांनी आपल्या पुढच्या ‘गुडबाय’च्या सेटवर सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था केली आहे. त्यांनी रविवारी मुंबईच्या चांदिवली स्टुडिओमध्ये याचे शूटिंग सुरू केले. यासाठी निर्मात्यांनी पूर्ण स्टुडिओच बुक करुन घेतला आहे. म्हणजेच चांदिवली स्टुडिओमध्ये फक्त ‘गुडबाय’चे शूटिंग सुरू आहे. या काळात कोणत्याही इतर प्रोजेक्टचे शूटिंग तेथे होणार नाही. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करणार आहे. अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकतासोबत काम करत आहेत.
आधी दहा चित्रपटांचे शूटिंग एकत्र चालायचे
शूटिंगदरम्यान बिग बी यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले, शूटिंग स्थळावर खूप काळजी घेतली जात आहे. लोकेशनच्या चहुबाजूंनी 3 ते 4 वेळेस सॅनिटाइज केले जाते. फक्त एकाच चित्रपटासाठी पूर्ण स्टुडिओ बुक करण्यात आला आहे. त्यामुळे बरीच जागा रिकामी असते, त्याची गरज पडत नाही मात्र कोरोना पसरू नये त्यामुळे हे करण्यात आले. हे पाहणेदेखील अविस्मरणीय आहे, कारण एकेवेळी येथे 10 चित्रपटाची शूटिंग सोबत चालायची. खरं तर, अमिताभ यांनी आपल्या अनेक चित्रपटातील आयकॉनिक दृश्ये येथेच शूट केली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.