आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवर अपघात:चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर स्टंटमॅन विवेकचा मृत्यू, पोलिसांनी स्टंट दिग्दर्शक, दिग्दर्शक आणि निर्मात्याला केली अटक

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रीकरणादरम्यान विवेकला विजेचा धक्का लागला होता, त्यातच त्याचा मृत्यू झाला

कन्नड चित्रपट ‘लव्ह यू राचू’ या चित्रपटाच्या सेटवरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर स्टंटमॅन विवेकचा मृत्यू झाला आहे. तो अवघ्या 28 वर्षांचा होता. या घटनेनंतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले असून पोलिसांनी चित्रपटाचा दिग्दर्शक, निर्माता आणि स्टंट डायरेक्टरला ताब्यात घेतले आहे. मृत विवेक हा मुळचा तामिळनाडू येथील आहे.

काय घडले होते सेटवर?

वृत्तानुसार, ही घटना सोमवारी घडली आहे. ‘लव्ह यू राचू’ या चित्रपटाचे कर्नाटकमधील बिडदी येथे चित्रीकरण सुरु होते. स्टंट करत असताना विवेकला एका धातूच्या तारेने बांधले होते. स्टंटमॅन विवेक एका हायव्होल्टेज वायरजवळ असणाऱ्या क्रेनवर उभा होता. यावेळी धातूच्या तारेसोबत संपर्क आल्याने त्याला विजेचा झटका बसला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान स्टंट करत असलेल्या दुसऱ्या स्टंटमॅनला देखील वीजेचा झटका बसला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर, निर्माते गुरु देशपाडे आणि स्टंट डायरेक्टर विनोद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहे.

‘लव्ह यू राचू’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता कृष्णा अजय रावने एका मुलाखतीमध्ये यावर वक्तव्य केले. ‘गेल्या काही दिवसांपासून आम्ही चित्रीकरण करत होतो. नेमके काय झाले हे मला माहित नाही. कारण मी चित्रीकरण सुरु असलेल्या ठिकाणापासून थोडे लांब होतो. मी काय झाले हे पाहिले नाही. मला जोरात ओरडण्याचा आवाज आला होता आणि त्यानंतर या अपघाताची माहिती मिळाली. आमच्या सर्वांसाठीच हे धक्कादायक होते,’ असे कृष्णा म्हणाला.

पुढे कृष्णा म्हणाला, ‘स्टंट डायरेक्टर्सना त्यांच्या कामात कुणीही हस्तक्षेप केलेला आवडत नाही. त्यामुळे त्यांना कुणी सल्ला देत नाही. मी सुरुवातील सेटवर लोकांना विचारले होते की धातूच्या तारेचा वापर करणे योग्य आहे का?’, असा प्रश्नदेखील त्याने उपस्थित केला होता. इतकेच नाही तर जोपर्यंत विवेकला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी शूटिंग सुरु करणार नाही, अशी भूमिका आता कृष्णाने घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...