आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री सई ताम्हणकरची नवीन वेबसीरिज पेट पुराण प्रेक्षकांच्या भेटीला सोनी लिव्हवर आली आहे. ही पाळीव प्राण्यांचे पालनपोषण करण्यावरील उत्साहवर्धक सोशल कॉमेडी सिरीज आहे. ही सीरिज शहरी, उदारमतवादी, विवाहित जोडपे अतुल व अदिती यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्या दोघांकडे दोन पाळीव प्राणी असून त्यात बाकू नावाची मांजर व व्यंकू नावाचा कुत्रा आहे. या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीने सई ताम्हणकरशी गप्पा मारल्या. यावेळी तिने पाळीव प्राण्यांसोबतचे रिहर्सल आणि शूटिंगमधील मजेदार किस्से यासह मनोरंजन विश्वात करियर बनवण्याऱ्या मुलींना मोलाचा सल्ला दिला.
अगदी नावाप्रमाणेच ही पाळीव प्राण्यांची गोष्ट आहे. आपल्याला मुले होऊ नयेत ही आजकाल अनेक जोडप्यांची इच्छा असते. परंतु कधीकधी त्यांना मुलाची गरज असल्याचे भासते. मग ते प्राणी पाळतात. अशाच परिस्थितीमधून अदिती आणि अतुल जात असतात. मग एके दिवशी आपण एखादा प्राणा पाळायचा हे ते ठरवात. पाळीव प्राणी आणल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की ही खूप मोठी जबाबदारी असून हे काम तर एखाद्या बाळाला जगात आणण्यापेक्षाही कठीण आहे. तिथून अदिती आणि अतुलाचा प्रवास सुरू होतो तेच हे पेट पुराण आहे.
अदिती ही सध्या युगातील मुलगी आहे. ती त्यांच्यापैकी एक आहे ज्यांना बाय-चॉइस मूल नको आहे. सेल्फ मेड आहे. ती आपल्या पतीसोबत राहते, पण तिने लग्नानंतर आपले आडनाव बदलले नाही. ती आजच्या मुलींसारखी स्वतंत्र आहे.
माझ्यासाठी ही खूप कठिण गोष्ट आहे. खरे सांगायचे तर, कधीकधी मला असे वाटते की मी स्वतःला नीट हाताळू शकत नाही. मग एखादा प्राणी आणि मूल दोन्ही कसे सांभाळणार? कदाचित भविष्यात मी मांजर वगैरे ठेवावे, पण अजून विचार केला नाही, कारण वेळापत्रकच इतके चढ-उतार असते की अर्धा वेळ आपण प्रवास करत असतो, त्यामुळे घरी नसतो. मग तुम्ही पाळीव प्राणी कुठे ठेवाल? यामुळे आजपर्यंत घरी एखादा पाळीव प्राणी मी आणला नाही. पण या वेबसिरीजनंतर मला वाटतं की मी स्वत:ला तयार करून एखादा प्राणी पाळू शकेल.
आम्ही कुत्रा आणि मांजर यांच्यासोबत सात दिवसांची कार्यशाळा केली. भावनिक जोड निर्माण करण्यासाठी हे करावे लागते. यामुळे आमच्यात मैत्री झाली. त्यानंतर आम्ही पुढचे पाऊल घेतले. खरे तर या मालिकेतील स्टार हे पाळीव प्राणीच आहेत. यातील कुत्र्याचे नाव व्यंक असून खरे नाव बडी आहे. एका सीनमध्ये बडीचे चार ते पाच टेक आहेत. आशावेळी तो सहाव्या टेकला बाहेर फिरायला जातो. एखाद्यावेळेस बडीचा एकादा क्लोझ टेक घेण्यासाठी तीन ते चार तास लागायचे. याविषयी निर्मात्यांना माहिती होते. पण तरिही त्यांनी हा विषय मांडण्याची हिंमत दाखवली.
एका सीनमध्ये आदिती व्यंकला आंघोळ घालते आणि व्यंक अंघोळीनंतर शरीर झटकतो. पण, शुटींग करताना व्यंकला अंघोळ घातल्यानंतर तो अंग झटकत नव्हता. असे आम्ही अनेक टेक घेतले. हा काही अंग झटकणार नाही, असे म्हणत मी हा सीन वगळण्याचे बोलले. पण, आम्ही पुन्हा तीन दिवसांनी तोच सीन शूट केला, मग बडीने पहिल्याच टेकमध्ये अंग झटकले. यात अनेक अशी काही क्षण आहेत. जी ठरवली नव्हती. हे असे सरप्राईज फक्त मुलं आणि पाळीव प्राणीच देऊ शकतात असे मला वाटते. हे ठरवून होत नाही. असाच आणखी एक आउटडोर सीन होता. ज्यात बडीला बाहेर जमिनीवर बसायचे होते. पण बाहेर उन्हात तो बसत नव्हता. मग ऊन नाही तर सावली आहे हे दाखवण्यासाठी लायटिंग बदलावी लागली. शेवटी, तो शोचा स्टार होता, म्हणून आम्ही देखील त्याच्यानुसार व्यवस्था केली.
तिन्हीवरही समान लक्ष राहिले. सध्या मी महाराष्ट्राची कॉमेडी जत्रा या शोला जज करत आहे. सोनी मराठीवर येणारा हा पहिल्या क्रमांकाचा शो आहे. तो पुढच्या वर्षीही येणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच काही वेब सिरीजही येत आहेत. माझे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लक्ष राहिल.
या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर माझा संघर्ष हा नातेसंबंधांबाबत जास्त राहिला. कारण इथे व्यस्त राहिल्यानंतर माझ्या जवळच्या लोकांसोबतच्या संबंधात समस्या आल्या. हाच माझा सर्वात मोठा संघर्ष होता.
मी मराठी चित्रपटामध्ये खूप व्यस्त होते. वेगवेगळ्या प्रकारची पात्रे आणि वेगवेगळे प्रोजेक्ट इथे पाहायला मिळत होते. त्यामुळेच माझे लक्ष इकडे-तिकडे वळेल, असे कधीच झाले नाही. काम हातामध्ये असल्यावर धावण्यात अर्थ नाही. मला हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचे असून ते ठरलेले आहे. तसं काम आलं तर मी करेन. लक्ष न वेधणारे दहा चित्रपट करण्यापेक्षा लक्षात राहणारे सात चित्रपट करणे चांगले असते.
नक्कीच, मी राज्यस्तरीय कबड्डीपटू आहे. मला कबड्डीशी संबंधित काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी मी काम करत आहे. त्यावर आता काहीही बोलणे खूप घाईचे होईल. तो अनुभव मी परत जगू शकेल असे काहीतरी बनवणार आहे. पण सध्या ते अगदी प्राथमिक अवस्थेत आहे.
हे कबड्डीत लागलेले नाही. एका शूटसाठी गेले होते. तिथे स्कूटीवरून पडले. हे अगदी सामान्य आहे. असे काही घडले नाही तर सामान्य जीवन जगत असल्याचे वाटत नाही.
नाही. मी राजकारणात जाण्याइतकी चपखल नाही. राजकारण ही मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी वेगळी मानसिकता हवी, वेगळं बिंज-अप आणि थोडंसं वातावरण राजकीय असायला हवं. सध्या, मी करत असलेल्या कामामध्ये बरेच काही करायचे बाकी आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत एक चांगली गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते, की तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचे असेल तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. तरच या क्षेत्रात या. कारण हे खूप अवघड क्षेत्र आहे. इथलं ग्लॅमर सगळ्यांना दिसते, लोकप्रियता दिसते, पण त्यामागची मेहनत मात्र दिसत नाही. जर तुमची अवस्था अशी असेल की तुम्ही अभिनय केल्याशिवाय राहू शकत नाही, तर या, हे क्षेत्र फक्त तुमच्यासाठी बनले आहे. तुम्ही प्रयत्न करून पाहण्यासाठी येत असाल तर मग एखादा बॅकअप प्लॉन नक्की ठेवा. रिकाम्या हाताने येऊ नका. इतकंच मी म्हणेन. विशेषत: मी मुलींना सांगेन की स्वतंत्र राहून स्वत:चे पैसे कमवणे हे एक वेगळे व्यसन आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे स्वप्न पहावे, जे खूप महत्त्वाचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.