आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांचा आज (24 जानेवारी) वाढदिवस असून ते वयाची 78 वर्षे पूर्ण करत आहेत. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला त्यांनी एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या प्री बर्थडे बॅशला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र चाहत्यांच्या नजरा खिळल्या त्या ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांच्यावर. ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनसोबत पार्टीत पोहोचली. तर सलमान खानसुद्धा पार्टीत दाखल झाला. दोघांचे पार्टीत एन्ट्री करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावेळी ऐश्वर्या निळ्या रंगाच्या डिझायनर सूटमध्ये दिसली. तिने केस मोकळे सोडले होते. या लूकमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसली. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला. तर अभिषेक अतिशय हँडसम लूकमध्ये दिसला. दरम्यान, अभिषेकसोबत ऐश्वर्याने पापाराझींना पोज दिली.
पार्टीत पोहोचला सलमान खान
सोशल मीडियावर पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओत सलमान खान या पार्टीत सहभागी होताना दिसतोय. सुभाष घई यांनी यावेळी पापाराझींसोबत केक कापला. या सेलिब्रेशनला सलमान सुभाष घईंसोबत उपस्थित होता. यादरम्यान सलमानचा फनी अंदाजही पाहायला मिळला.
पार्टीतून लवकर बाहेर पडल्या जया बच्चन
सुभाष घई यांच्या पार्टीत जया बच्चन सहभागी झाल्या होत्या. यावेळी जया बच्चन व्हाइट अनारकलीत दिसल्या. मात्र जया लवकरच पार्टीतून बाहेर पडल्या. त्यांना कारपर्यंत सोडायला स्वतः सुभाष घई पोहोचले होते. समोर आलेल्या फोटोत महिमा चौधरीदेखील त्यांच्यासोबत दिसत आहे. महिमादेखील जया बच्चन यांना सोडायला गेटपर्यंत आली होती. महिमाला सुभाष घई यांच्या परदेस या चित्रपटासाठी ओळखले जाते.
सुभाष घईंच्या बर्थडे पार्टीत पोहोचले हे सेलेब्स
सलमान, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या व्यतिरिक्त सुभाष घई यांच्या बर्थडे पार्टीत जॅकी श्रॉफ, कार्तिक आर्यन, राकेश रोशन, अनुपम खेर, अनिल कपूर, अलका याज्ञिक, मीजान जाफरी आणि रोनित रॉय, रोहित रॉय कुटुंबासोबत पोहोचले होते.
सुभाष घई यांचे चित्रपट
सुभाष घई यांनी 80 आणि 90च्या दशकात अनेक हिट चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली. 'कालीचरण', 'विश्वनाथ', 'कर्ज', 'हीरो', 'विधाता', 'मेरी जंग', 'कर्मा', 'राम लखन', 'सौदागर', 'खलनायक', 'परदेस' आणि 'ताल' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. सलमान खानने 2008 मध्ये सुभाष घई दिग्दर्शित 'युवराज' या चित्रपटात काम केले होते. तर ऐश्वर्या घईंच्या 'ताल' चित्रपटात झळकली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.