आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सक्लूझिव्ह:कार्तिक आर्यनच्या समर्थनात पुढे आले कुमार मंगत पाठक, म्हणाले - त्याने कधीच स्क्रिप्टमध्ये छेडछाड केली नाही, तो कुठेही भेटला तर आधी पाया पडतो

अमित कर्ण18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुमार मंगत पाठक यांनी कार्तिकला 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाद्वारे पहिला ब्रेक दिला होता.

करण जोहरसोबत बिनसल्यामुळे कार्तिक आर्यनवर रोज काही ना काही आरोप होत आहेत. इंडस्ट्रीतील काही जण त्याच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत आहेत तर काही जण त्याला यश पचवता येत नसल्याचे म्हणत आहेत. मात्र कार्तिकने या सर्व गोष्टीवर मौन धरले आहे. मात्र त्याच्या सोबत काम केलेल्या काही निर्मात्यांनी कार्तिक कसा आहे, हे सांगितले आहे. त्यांनी कार्तिकच्या समर्थनात पुढे येऊन आपली मते मांडली आहेत.

‘प्यार का पंचनामा’ सारख्या हिट सिरिजमध्ये कार्तिकला संधी देणारे निर्मातु कुमार मंगत पाठकने कार्तिकला क्लीन चिट दिली आहे. दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'कार्तिक खूपच समजदार मुलगा आहे. त्याच्या डोक्यात यशाची हवा घुसली नाही. त्याने कधीच माझ्या चित्रपटात स्क्रिप्टमध्ये बदलाची मागणी केली नाही. अजूनही तो कुठेही कधीही भेटतो तर आधी पाया पडतो मग बोलतो. आम्ही आताही एक चित्रपट करत आहोत. त्याच्यावर पुढच्या वर्षी काम सुरू होणार आहे.'

'कांची’च्या वेळी शिस्तप्रिय हाेता, आताचे माहीत नाही : सुभाष घई
‘कांची’ या चित्रपटाचे निर्माते सुभाष घई यांनी सांगितले, 'कोणत्याही माणसाचा खरा स्वभाव त्याच्या चढत्या यशातच कळतो. सुरुवातीच्या काळात प्रत्येकजण नम्र आणि निष्पाप राहतो. तो नेहमीच एका विद्यार्थ्याप्रमाणे माझ्याबरोबर काम करत होता. मी तीन वर्षांपासून त्याला भेटलो नाही. त्यानेदेखील कधी फोन केला नाही. त्याला माझा आशीर्वाद आहे. माझ्या शुभेच्छा त्यांच्यासमवेत आहेत. कांचीनंतर मीदेखील त्याला कोणत्याही सिनेमासाठी विचारणा केली नाही.'

बातम्या आणखी आहेत...