आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हॅपी बर्थडे संजय दत्त:मी आणि संजू मिळून लवकरच ‘खलनायक रिटर्न्स’बनवू, दिग्दर्शक सुभाष घईंनी उलगडल्या संजय दत्तबद्दलच्या या खास गोष्टी

शब्दांकन : अमित कर्ण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता संजय दत्तचा आज वाढदिवस आहे.

बॉलिवूडचे ‘मुन्ना भाई’ म्हणजेच संजय दत्त यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या सुपरहिट ‘खलनायक’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने केलेली चर्चा.... त्यांच्याशी झालेला संवाद त्यांच्याच शब्दांत..

"संजय आणि माझी पहिली भेट माझे जवळचे मित्र सुनीलजी आणि नर्गिस यांच्यासोबत त्यांच्या 10 पाली हिल रोड अजंता अपार्टमेंटमध्ये झाली होती. तेव्हा संजय लहान मुलाप्रमाणे खट्याळ होते. मग अनेक वर्षांनंतर टीना मुनीम यांच्या पार्टीमध्ये जेव्हा आमची भेट झाली तेव्हा संजय एकदम तरुण, हँडसम दिसले. आपल्यापेक्षा मोठ्यांना ते ‘जी अंकल’ म्हणून आदराने बोलायचे. आजही त्यांच्या तोंडात ‘हां अंकल’ हेच शब्द निघतात. माझ्या ‘विधाता’ या चित्रपटात मी दिलीप कुमारसोबत संजय दत्तला घ्यायचा विचार केला होता. त्यानंतर निर्माते गुलशन राय यांना मी संजय दत्त यांचे नाव सुचवले आणि हा चित्रपट हिट ठरला. 1993 मध्ये जेव्हा खलनायक चित्रपट बनवला तेव्हा ते मला उत्कृष्ट दिग्दर्शक समजू लागले. मी अनेक वेळा त्यांच्यावर नाराज झालो, पण गोड हसून समोरच्या व्यक्तीला आपल्या बाजूला वळवणे ही कला त्यांना चांगलीच अवगत आहे. लवकरच आम्ही दोघे मिळून 'खलनायक रिटर्न्स’ बनवणार आहाेत.

संजू निष्काळजीपणे वागतात पण स्वतःवर संकट आले, ती परिस्थिती त्यांनी चांगली हाताळली. त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. “विधाता’च्या सेटवर ते मोकळे वागायचे. दहा वर्षांनंतर खलनायकच्या सेटवर त्यांना मेहनत करतानाही पाहिले. आता तर ते पूर्णपणे प्रोफेशनल स्टार झालेत. ते प्रसिद्धी आणि पैशाच्या मागे कधी धावले नाहीत.

नात्यांमध्ये अनेक चढ-उतार असतानादेखील त्यांनी त्यांची मैत्री निभावली. ते इंट्रोवर्ड आहेत त्यामुळे अनेक वेळा आपल्या भावना चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकत नाहीत. समजून घ्यायचे असेल तर खलनायकच्या क्लायमॅक्स साँगमध्ये त्यांचा परफॉर्मन्स बघा. शेवटच्या कडव्याकडे लक्ष दिले तर संजू काय आहे, तुम्हाला समजून जाईल. त्यातल्या या काही ओळी....‘बचपन में लिखी कहानी मेरी कैसी बदलती जवानी मेरी सारा समंदर मेरे पास हैं एक बूंद पानी मेरी प्यास है’