आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:सुधा चंद्रन यांचे वडील आणि 'चायना गेट'सारख्या चित्रपटात झळकलेले अभिनेते के. डी. चंद्रन यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • के. डी. चंद्रन हे डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) या आजाराने पीडित होते.

अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते के. डी. चंद्रन यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी मुंबईच्या जुहू येथील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एका न्यूज वेबसाइटशी बोलताना सुधा चंद्रन यांनी सांगितले की, त्यांचे वडील डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) या आजाराने पीडित होते. 12 मे रोजी त्यांना जुहूच्या क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे 16 मे रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

के. डी. चंद्रन यांनी या चित्रपटात केले होते काम
के. डी. चंद्रन यांनी 'हम हैं राही प्यार के', 'चायना गेट', 'जूनून', 'पुकार', 'कॉल', 'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं', 'जब प्यार किसी से होता है', 'तेरे मेरे सपने', 'हर दिल जो प्यार करेगा', 'शरारत'
आणि 'कोई मिल गया'सह अनेक चित्रपटांत काम केले. याशिवाय ते अनेक टीव्ही शोजमध्येही झळकले होते. यामध्ये 'स्टार बेस्टसेलर: गुलमोहर' या शोचा समावेश आहे.

कोण आहेत सुधा चंद्रन?
सुधा चंद्रन या प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री तसेच एक ट्रेंड आणि लोकप्रिय भरतनाट्यम डान्सर आहेत. त्यांना विशेषतः 'कही किसी रोज' या मालिकेली रमोला सिकंद या भूमिकेसाठी ओळखले
जाते. याशिवाय त्यांनी 'नागीन' या लोकप्रिय टीव्ही मालिकेच्या पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या भागात यामिनीची भूमिका साकारली आहे.

सुधा यांनी 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या तामिळ रिमेकमध्ये चित्रादेवीची भूमिका साकारली आहे. मुळ हिंदी मालिकेत हीच भूमिका रुपल पटेल (कोकिला पराग मोदी) यांनी साकारली होती. सुधा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'मयूरी' या तेलुगु चित्रपटासाठी त्यांना 33 व्या राष्ट्रीय पुरस्कार (1985) सोहळ्यात विशेष ज्युरी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...