आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या चर्चेत आहे. किंग खानची ही लाडकी लेक लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज आहे. पण यासोबतच ती बिग बींचा नातू आणि श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदासोबतच्या नात्यामुळेही चर्चेत आहे. मंगळवारी सुहाना आणि अगस्त्य एकत्र डिनर डेटवर स्पॉट झाले होते. दोघांचा एकत्र रेस्तराँमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यावेळी अगस्त्यची आई श्वेता बच्चन नंदादेखील त्यांच्यासोबत दिसली.
सुहानाच्या लूकने वेधले लक्ष
अगस्त्य आणि सुहानाचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सुहाना खान ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसतेय. सुहानाच्या या क्लासी लूकचे फॅन्स कौतूक करत आहेत. श्वेता बच्चनच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती स्काय ब्लू टॉप आणि जीन्समध्ये मोकळ्या केसांमध्ये दिसली. तिचा मुलगा अगस्त्य नंदा याने काळा स्वेट शर्ट आणि जीन्स घातली होती.
'द आर्चिज' एकत्र दिसणार आहेत सुहाना आणि अगस्त्य
सुहाना खान आणि अगस्त्य नंदा लवकरच 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर देखील दिसणार आहे. झोया अख्तरच्या या चित्रपटात हे तीन स्टार किड्स एकत्र दिसणार आहेत. अगस्त्यने या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारली होती. सुहाना वेरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर खुशी कपूर बेट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मिहिर आहुजा, युवराज मेंडा आणि वेदांग रैना यांच्याही भूमिका आहेत. पुढच्या वर्षी नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.