आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची पुतनी अलाना पांडे आज (16 फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी अलानाच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. मेंदी, हळदीनंतर बुधवारी रात्री संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या खास सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान, बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानची लाडकी सुहाना खान देखील या सोहळ्यात सहभागी झाली होती. दरम्यान तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुहानाने तिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांनी मने जिंकली. सुहानाने नेसलेली साडी तिची आई गौरी खानची आहे. या साडीत सुहाना अतिशय सुंदर दिसली.
आई गौरी खानची नेसली साडी
संगीत सोहळ्यासाठी सुहानाने एक सिल्व्हर सीक्वेन साडीची निवड केली होती. यासह तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज पेअर केले होते. यासह तिने छोटे कानातले घातले होते. लाइट मेकअप आणि केस मोकळे सोडत तिने आपला हा लूक पूर्ण केला होता. विशेष म्हणजे यावेळी सुहानाने जी साडी नेसली होती, ती साडी तिची आई गौरी खानची आहे. काही दिवसांपूर्वी गौरी या साडीत स्पॉट झाली होती. या साडीत सुहानादेखील अतिशय गॉर्जिअस दिसली. तिचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.
सुहाना खानचे करिअर
सुहानाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहानाने बालपणापासूनच सिनेसृष्टीत करिअर करायचे स्वप्न बाळगले होते. ती फक्त योग्य प्रोजेक्टची वाट पाहत होती. 'द आर्चीज'मध्ये सुहानासोबत बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.