आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द आर्चीज:चित्रपटाच्या सेटवरुन लीक झाला सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांचा लूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे सर्व स्टार किड्स त्यांच्या लूक टेस्टसाठी चित्रपटाच्या सेटवर पोहोचले होते.

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि संजय कपूर यांचा मुलगा जहान कपूर झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चिज' या म्युझिकल चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. अलीकडेच, चित्रपटाच्या सेटवरील त्यांचा पहिला लूक सोशल मीडियावर समोर आला आहे. चित्रपटात सुहाना 'वेरोनिका'च्या भूमिकेत, अगस्त्य 'आर्ची एंड्रयूज'च्या भूमिकेत, खुशी 'बॅटी कूपर'च्या भूमिकेत आणि जहान 'जॅगहेड जॉन्स'च्या भूमिकेत दिसणार आहे. खरंतर हे सर्व स्टार किड्स त्यांच्या लूक टेस्टसाठी चित्रपटाच्या सेटवर पोहोचले होते.

  • झोयाने गेल्या वर्षी दिली होती या चित्रपटाबद्दलची माहिती

दिग्दर्शिका झोया अख्तरने गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे वर्णन करताना ती म्हणाली होती की, ती 'आर्ची कॉमिक्स'ला चित्रपटाचे रुप देणार आहे. 'आर्ची कॉमिक्स'चे स्क्रीनशॉट शेअर करत झोयाने सोशल मीडियावर या प्रोजेक्टची माहिती दिली होती. या चित्रपटातील कलाकारांबाबत तिने त्यावेळी कोणताही खुलासा केला नव्हता. मात्र सुहाना खान झोयाच्या ऑफिसबाहेर दिसल्यानंतर सुहाना या चित्रपटात असल्याचा अंदाज बांधला जात होता. खुशी, अगस्त्य आणि जहान पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहेत, तर सुहाना याआधी 'द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली आहे.

  • या चित्रपटासाठी एक्साइडेट आहे झोया

झोया तिच्या या प्रोजेक्टसाठी खूप उत्साहित आहे. काही महिन्यांपूर्वी झोया म्हणाली होती की, आर्ची कॉमिक्स तिच्या बालपण आणि किशोरावस्थेतील महत्त्वाचा भाग आहे. त्यातील पात्रे आयकॉनिक असून त्यांना जागतिक स्तरावर लोकांचे प्रेम मिळाले आहे. झोया या चित्रपटासाठी खूप दिवसांपासून तयारी करत आहे आणि चित्रपट करण्यासाठी खूप उत्सुक आहे. झोयाबद्दल बोलायचे झाले तर तिने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'दिल धडकने दो' आणि 'गली बॉय' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...