आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे:सुहाना खानने आई गौरी खानला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला आईवडिलांचा थ्रोबॅक फोटो

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गौरी खानचा आज 51वा वाढदिवस आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खान आज वाढदिवस आहे. याच निमित्ताने तिची लाडकी लेक सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गौरी आणि शाहरुखचा 90 च्या दशकातील एका जुन्या फोटोशूटमधील थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. गौरीच्या 51 व्या वाढदिवसा निमित्ताने सुहानाने हा खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे कॅप्शन सुहानाने दिले आहे.

गौरी ही मुळची दिल्लीची आहे. तिचे शिक्षण हे दिल्लीत झाले आहे. गौरी एक इंटेरिअर डिझायनर असून तिने फक्त मन्नत नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घराचे इंटेरिअर डिझाइन केले आहे.​​​​

मीडियासमोर आले नाहीत गौरी आणि शाहरुख
क्रूझ ड्रगप्रकरणी शाहरुख आणि गौरीचा मोठा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे. सध्या हा काळ खान कुटुंबासाठी अतिशय कठीण आहे. आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख आणि गौरी मीडियासमोर आले नाहीत. अद्याप या प्रकरणावर दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान गौरी आर्यनला भेटायला गेली होती. यावेळी गौरी आर्यनसाठी McD मधून बर्गर घेऊन गेली होती. मात्र, सुरक्षेचे कारण देत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला होता.

हृतिक रोशनने दिला आर्यनला पाठिंबा
एनसीबीने शनिवारी मुंबई ते गोवा प्रवास करणा-या कार्डिएला क्रूझवर कारवाई करत हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता या यादीत अभिनेता हृतिक रोशनचे नाव जोडले गेले आहे. हृतिकने आर्यनला पाठिंबा देणारी एक पोस्ट त्याच्या फोटोसह सोशल मीडियावर गुरुवारी शेअर केली. हृतिकने या पोस्टमध्ये आर्यनला या कठिण काळाचा त्याने कसा सामना करायला हवा, हे सांगितले आहे. हृतिकने लिहिले होते, ‘माझा प्रिय आर्यन, जीवन हा एक विचित्र प्रवास आहे. कारण अनेक गोष्टी या अनिश्चित असतात. ईश्वर फार दयाळू आहे. तो कणखर व्यक्तींनाच कठीण चेंडू खेळण्याची संधी देतो.’ असे म्हणत हृतिकने संयमी आणि एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत दाखवणाऱ्यांवरच असा प्रसंग येतो असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे हृतिक म्हणाला, ‘तू आता या परिस्थितीचा सामना करत आहे. तुमच्यामधील एका हिरोला बाहेर आणण्यासाठी या गोष्टी आयुष्यात होणे गरजेचे आहे. पण सावध रहा. कारण या गोष्टी तुझ्यामधील दयाळूपणा, प्रेम अशा अनेक गोष्टींवर परिणाम करतात.’ हृतिक रोनच्या या पोस्टवर त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने प्रतिक्रिया देताना हेच सत्य आहे, असे लिहिले. हृतिकच्या या पोस्टवर काही नेटक-यांनी मात्र ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यनला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला ट्रोलदेखील केले आहे.

बातम्या आणखी आहेत...