आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुसाइड ऑर मर्डर:सुशांत डेथ मिस्ट्रीवर आधारित चित्रपटातील खलनायकाचा फर्स्ट लूक आला समोर, लूक बघून सोशल मीडिया यूजर्स करताहेत करण जोहरशी तुलना

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉडेल राणा नेपोकिंगची चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या डेथ मिस्ट्रीवर आधारित 'सुसाइड ऑर मर्डर: ए स्टार वॉज लॉस्ट' या चित्रपटातील खलनायकाचा पहिला लूक समोर आला आहे. मॉडेल राणाने या चित्रपटात चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारली असून त्याच्या व्यक्तिरेखेला नेपोकिंग असे म्हटले आहे. राणाचा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स त्याची तुलना चित्रपट निर्माता करण जोहरशी करत आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म व्हीएसजी बिंज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पोस्टर शेअर केले आहे. ‘तो एक मोठा चित्रपट निर्माता आहे. पण तो फक्त स्टार किड्सला लाँच करतो. मॉडेल राणा नेपोकिंगची चित्रपटात भूमिका साकारणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • सोशल मीडिया यूजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया

राणाचा चित्रपटातील फर्स्ट लूक बघून एका नेटक-याने लिहिले की, "म्हणजे तो करण जोहरच असेल?". "मला वाटते की हा करण जोहर आहे", अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

  • सचिन तिवारी मुख्य भूमिकेत आहेत

चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसारखा हुबेहुब दिसणारा टिकटॉकर सचिन तिवारी मुख्य भूमिका साकारत आहे. शमिक हा मूळ चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्म व्हीएसजी बिंजवर हा चित्रपट स्ट्रिम केला जाऊ शकतो.

  • बॉलिवूडच्या इनसाइडर्सचा खरा चेहरा आणणार समोर

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच हे पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाचे निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ‘मी हा चित्रपट यासाठी करत आहे जेणे करुन मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे मोठे स्टार्स आणि प्रॉडक्शन हाऊसची एकाधिकारशाही आहे ती संपवली पाहिजे या हेतूने मी हा चित्रपट बनवत आहे’ असे त्यांनी म्हटले होते.

  • सप्टेंबरमध्ये हा चित्रपट फ्लोअरवर येऊ शकतो

निर्माते विजय शेखर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट सुशांतची बायोपिक नाही. त्याच्या आयुष्यावरुन प्रेरणा घेण्यात आलेली आहे. सप्टेंबरमध्ये हा चित्रपट फ्लोअरवर येऊ शकेल. याचे शूटिंग मुंबई आणि पंजाबमध्ये होणार आहे.