आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतचा मेणाचा पुतळा:लंडनच्या मादाम तुसाँमध्ये सुशांतचा पुतळा उभारण्याची चाहत्यांची मागणी,  बंगालच्या सुकांतो यांनी बनवला आपल्या लाडक्या अभिनेत्याचा मेणाचा पुतळा

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये तयार करण्यात आला आहे.

महिन्याभरापूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांनी लंडनच्या मादाम तुसाँमध्ये त्याचा मेणाचा पुतळा उभारला जावा, अशी मागणी केली होती. आता लंडनमध्ये सुशांतचा पुतळा उभारला जाणार की नाही, हे येणा-या दिवसांत कळेल. मात्र भारतात सुशांतच्या एका जबरा फॅनने त्याचा मेणाचा पुतळा तयार केला आहे.

सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये तयार करण्यात आला आहे. येथील संग्रहालयात तो ठेवण्यात आला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा हा पुतळा सुकांतो रॉय यांनी बनवला आहे. या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा हा पुतळा पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

  • कुटुंबीयांची इच्छा असेल तर पुन्हा बनवणार पुतळा

पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे राहणारे शिल्पकार सुकांतो रॉय यांनी सुशांतचा मेणाचा पुतळा साकरला. 'मला सुशांत खूप आवडतो, तो आता या जगात नाही', अशा शब्दात रॉय यांनी आपली हळहळ व्यक्त केली. सुशांतच्या कुटुंबियांना देखील अशा पद्धतीचा मेणाचा पुतळा हवा असेल तर तो तयार करून देण्याची ऑफर देखील रॉय यांनी दिली आहे.

  • पुतळ्यासाठी दोन लाखाहून अधिक सह्या

लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात सुशांतचा मेणाचा पुतळा बसवावा अशी मागणी सुशांतचे चाहते सतत करत आहेत. यासाठी ऑनलाईन याचिका ऑगस्टपासून सुरू आहे. सुशांतची बहीण श्वेतासिंह किर्ती हिनेदेखील लोकांनी त्यावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी दोन लाख सह्यांचे लक्ष्य होते, परंतु आता ते 3 लाख करण्यात आले आहे.

आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत. आनंदाची बाब म्हणजे ही याचिका तुसाँ म्युझियममध्ये पोहोचली आहे. सुशांतचे नाव फिगर रिक्वेस्टमध्ये आल्याचे त्यांच्याकडून उत्तर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...