आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून जॅकलिन फर्नांडिसला एक प्रेम पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्याने पुन्हा एकदा जॅकलिनवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. सुकेशने या पत्रातून जॅकलिनने ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरचे वकील अनंत मलिक यांनी हे पत्र जारी केले आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनसाठी एक खास मेसेज लिहिला आहे.
सुकेश म्हणतो, 'माय बेबी, माय बोम्मा. जॅकलिन तुला ईस्टरच्या शुभेच्छा. हा तुझा सगळ्यात आवडता सण आहे. माहिती आहे की तुला ईस्टर एग्ज खूप आवडतात. याशिवाय तुझी खूप आठवण येतेय,' असे त्याने या पत्रात लिहिले आहे.
तो पुढे म्हणाला, 'तुला माहित्ये, की तू खूप सुंदर दिसतेय. तुझ्याहून सुंदर कुणी नाहीये. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला माहितीये की, तुलाही माझी आठवण येतेय.'
याआधी स्वतःच्या वाढदिवशी जॅकलिनला लिहिले होते पत्र
याआधी सुकेश चंद्रशेखरने 25 मार्च रोजी त्याच्या वाढदिवशी जॅकलिनला पत्र लिहिले होते. या पत्रात त्याने जॅकलिन फर्नांडिसला बेबी म्हटले आणि तो तिला मिस करत असल्याचेही लिहिले होते. त्याने लिहिले होते, 'माझ्या बोम्मा, माझ्या वाढदिवशी मला तुझी खूप आठवण येते, मला तुझी एनर्जी माझ्या सभोवताली जाणवते. माझ्याकडे शब्द नाहीत, पण मला माहित आहे की तुझे माझ्यावरचे प्रेम कधीच संपणार नाही. तुझ्या हृदयात काय आहे हे मला माहीत आहे. मला पुराव्याची गरज नाही आणि माझ्यासाठी फक्त तुझे प्रेमच पुरेस आहे. बेबी.'
पुढे पत्रात तो म्हणाला होता की, 'तुला माहिती आहे, काहीही झाले तरी मी नेहमीच तुझ्यासाठी उभा आहे. मी तुझ्यावर खुप प्रेम करतो बेबी. मला तुझे हृदय दिल्याबद्दल धन्यवाद.'
200 कोटी खंडणी प्रकरणात जॅकलिन आरोपी
या प्रकरणात जॅकलिनदेखील आरोपी आहे. ईडीने अनेकदा जॅकलिनची चौकशी केली आहे. तसंच तिला देश सोडण्यावरही बंदी घालण्यात आली होती. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरने 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा सर्व पैसा सुकेशने केलेल्या 200 कोटीं रुपयांच्या फसवणुकीतला असल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकरणाची जॅकलिनला कल्पना असूनही तिने या भेटवस्तू स्वीकारल्याने तिला या प्रकरणात आरोपी घोषित केले होते.
त्याने माझे आयुष्य उद्धवस्त केले - जॅकलिन
जॅकलिनने मात्र सुकेशसोबतचे संबध नाकारले आहेत. 18 जानेवारी 2023 रोजी जॅकलिन दिल्लीतील पतियाळा कोर्टात हजर झाली होती. तेव्हा जॅकलिन म्हणाली होती की, सुकेशने माझी दिशाभूल केली. माझे करिअर, माझे आयुष्य त्याने उद्धवस्त केले. मला नंतर समजले, की त्याला गृह आणि कायदा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याशिवाय त्याचं खरे नावही त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर समजल्याचे तिने सांगितले. सुकेशने माझी फसवणुक केल्याचे तिने म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.