आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक घोटाळा रुपेरी पडद्यावर:ठग सुकेश चंद्रशेखर-जॅकलिनवर येतोय चित्रपट, दिग्दर्शकाचा 6 महिने दिल्लीत मुक्काम

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला ठग सुकेश चंद्रशेखरवर लवकरच मोठ्या पडद्यावर चित्रपट येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक आनंद कुमार सुकेशचा जीवनपट रुपेरी पडद्यावर आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी नुकतीच तिहार तुरुंगाच्या एएसपींची भेट घेतल्याची चर्चा आहे.

आनंद कुमार सुकेशशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी माहिती गोळा करत आहेत. सूत्रांनुसार, हा चित्रपट 2024 च्या उत्तरार्धात किंवा 2025 च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आनंद कुमार यांनी याआधी ‘जिला गाजियाबाद’, ‘देसी कट्टे’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे.

सुकेशची कथा खूप रंजक होऊ शकते
तिहार जेलचे एएसपी जेलर दीपक शर्मा म्हणाले की, सुकेशची कहाणी खूप रंजक आहे. आनंद यांनी ती फिक्शन बनवण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे आनंद कुमार यांनी सुकेशसंबंधीची माहिती गोळा करण्यासाठी तिहार तुरुंगाचा एक दौरा केला होता. दीपक शर्मा यांनी स्वतः आनंद कुमार यांच्याबरोबरच्या भेटीचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आनंद कुमार यांनी 6 महिन्यांसाठी दिल्लीत हॉटेल बुक केले
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक आनंद कुमार यांनी सहा महिन्यांसाठी दिल्लीत एक पंचातारांकित हॉटेल बुक केले आहे. तिथे चित्रपटाच्या लेखकांचा मुक्काम असेल आणि ते प्रोजेक्टवर काम सुरू करतील. सध्या या चित्रपटाची स्टारकास्ट आणि लोकेशनबद्दलची माहिती समोर आलेली नाही, मात्र लवकरच याची अधिकृत पुष्टी केली जाईल.

चित्रपटात सुकेशने केलेला घोटाळा, त्याची प्रेमप्रकरणे दाखवणार
मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने राजकारणी, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना कसे फसवले हा चित्रपटाच्या कथेचा महत्त्वाचा भाग असेल. त्याने लोकांना कोट्यवधी रुपयांचा कसा गंडा घातला, तसेच चित्रपट अभिनेत्रींसोबतच्या त्याच्या अफेअरशी संबंधित प्रत्येक बाबी या चित्रपटात सविस्तरपणे दाखवण्यात येणार आहेत. म्हणजेच सुकेश आणि जॅकलिन फर्नांडिस यांची लव्ह स्टोरीदेखील यात पाहायला मिळेल.

कोण आहेत सुकेश चंद्रशेखर?
सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरू येथील रहिवासी आहेत. आलीशान आयुष्य जगण्यासाठी त्याने वयाच्या 17 व्या वर्षी पासून लोकांची फसवणूक करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. बंगळुरूमध्ये लोकांची फसवणूक केल्यानंतर त्याने चेन्नई आणि इतर शहरांमध्येही लोकांना लक्ष्य केले. आघाडीचे राजकारणी, उद्योगपतींपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या निशाण्यावर होते. 75 जणांचे 100 कोटी रुपये घेऊन तो फरार झाला होता.

निवडणूक आयोगात ओळख असल्याचे सांगून हवे ते चिन्ह मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 मध्ये अटक केली होती. त्यानंतर आता दिल्लीच्या तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपये वसूल केल्या प्रकरणी त्याला अटक झाली होती. त्याने रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकाच्या पत्नीला गंडवले होते.

अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू देऊनही प्रसिद्धीच्या झोतात आला होता
ईडीच्या कारवाईत सुकेशसोबतच जॅकलिन फर्नांडिसचेही नाव समोर आले आहे. ईडीच्या अहवालानुसार सुकेश आणि जॅकलिन यांच्यात जानेवारी 2021 पासून बातचित सुरू झाली होती. तिहार तुरुंगात असतानाही सुकेश जॅकलिनशी फोनवर बोलत असे.

सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. यामध्ये 52 लाखांचा अरबी घोडा, 9-9 लाख रुपयांच्या 3 पर्शियन मांजरी, डायमंड सेटसारख्या महागड्या भेटवस्तूंचा समावेश आहे.

सुकेशच्या म्हणण्यानुसार, तो आणि जॅकलिन रिलेशनशिपमध्ये होते आणि लवकरच लग्न करणार होते. तर दुसरीकडे सुकेश तिच्या भावनांचा खेळ मांडला, असे जॅकलिनने म्हटले आहे. जॅकलिनने सुकेशवर फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणात नोरा फतेही हिचेदेखील नाव समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...