आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली तुरुंगात बंद असलेला सुकेश चंद्रशेखर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सातत्याने प्रेमपत्रे पाठवत आहे. नुकतेच सुकेशने त्याचे वकील अनंत मलिक यांच्या मार्फत पुन्हा एक पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये त्याने जॅकलिनच्या वाढदिवसानिमित्त एक मोठे सरप्राईज प्लॅन केल्याचा उल्लेख केला आहे. 11 ऑगस्टला जॅकलिनचा वाढदिवस आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सुकेश चंद्रशेखरने सर्वप्रथम आपल्या पत्रात अवॉर्ड शोमधील जॅकलिनच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे- 'माय लव्ह, माय बेबी जॅकलीन, माय बोम्मा (बाहुली), मी 28 एप्रिलला फिल्मफेअर अवॉर्ड पाहिला. मी कबूल केले पाहिजे की तू उत्कृष्ट होतीस आणि तुझा परफॉर्मन्स सर्वोत्तम होती. त्या संपूर्ण अवॉर्ड शोमध्ये तुझा डान्स सर्वोत्कृष्ट होता. तू खूप मोहक, उत्कृष्ट, सुपर हॉट आहेस आणि आता तू मला तुझ्या प्रेमात पूर्वीपेक्षा जास्त वेड लावले आहेस. माझ्याकडे शब्द नाहीत. तू बॉम्ब आहेस, सुपरस्टार आहेस, माय बेबी गर्ल.'
सुकेश जॅकलिनच्या वाढदिवसाला सरप्राईज प्लॅन करत आहे
पुढे पत्रात सुकेशने लिहिले आहे की, 'तू माझ्या आयुष्यात आहेस हे माझे भाग्य आहे, माझ्या राणी. बोट्टा बोम्मा (सुंदर बाहुली) मी तुझ्यावर प्रेम करतो. माझा प्रत्येक क्षण फक्त तुझ्यासाठी आहे. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला माहीत आहे. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुलाही माहीत आहे. मला तुझी खूप आठवण येत आहे. तुझ्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडे एक मोठे सरप्राईज आहे, जे तुला आवडेल. मी माझे वचन पाळत आहे. मी वाट पाहू शकत नाही.'
सुकेश जॅकलीनसमोर स्वतःला टीव्ही चॅनलचा मालक सांगायचा
सुकेश चंद्रशेखरशिवाय त्याची पत्नी लीनाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे. या प्रकरणात नाव जोडल्यानंतर जॅकलीनही चौकशीच्या फेऱ्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पटियाला हाऊस कोर्टात दिलेल्या जबाबात सुकेशने जॅकलीनचा बचाव करत या प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.
जॅकलीनने तिच्या जबाबात म्हटले होते की, ती सुकेशला सन टीव्हीचा मालक म्हणून ओळखते, ती चित्रपटाच्या निर्मितीच्या संदर्भात त्याला भेटली होती. जॅकलीनने सांगितले की, तो तिला तुरुंगातूनही फोन करत असे, मात्र तो तुरुंगात असल्याचे त्याने सांगितले नव्हते.
ही बातमीही वाचा...
थेट तुरुंगातून प्रेमपत्र:सुकेश चंद्रशेखरचे जॅकलिन फर्नांडिसला नवीन पत्र, म्हणाला - 'मला माहितीये की, तुलाही माझी आठवण येतेय...'
200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून जॅकलिन फर्नांडिसला एक प्रेम पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्याने पुन्हा एकदा जॅकलिनवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. सुकेशने या पत्रातून जॅकलिनने ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुकेश चंद्रशेखरचे वकील अनंत मलिक यांनी हे पत्र जारी केले आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनसाठी एक खास मेसेज लिहिला आहे. (वाचा पूर्ण बातमी)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.