आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या तिहार तुरुंगात कैद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने तुरुंगातून पुन्हा एक पत्र लिहिले आहे. त्यात त्याने चाहत खन्नाचा उल्लेख करत लिहिले की, 'मला विवाहित किंवा मुले असलेल्या महिलांमध्ये रस नाही. मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर (पैशांसाठी संबंध ठेवणारे) नाही. चाहत आणि निक्की तांबोळी यांच्यासोबत माझे संबंध केवळ व्यावसायिक कारणांमुळे होते.'
चाहतने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, सुकेशने फसवणूक करून तिला तुरुंगात भेटायला बोलावले होते आणि गुडघ्यावर बसून प्रपोजही केले होते. सुकेशने चाहतचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्याची आणि चाहतची भेट एक प्रोफेशनल भेट होती, असे त्याने स्पष्ट केले आहे.
चाहत ही 10 वर्षांची लहान मुलगी नाही
फसवणूक करुन तिहार तुरुंगात नेल्याचे चाहतने म्हटले होते. मात्र आता सुकेशने तिचा हा दावा फेटाळून लावला आहे. सुकेशने आपल्या लिहिले की, 'चाहत म्हणते की तिला तिहार तुरुंगात आणले जात आहे, याची तिला माहित नव्हती. पण मी म्हणतो की, ती 10 वर्षांची लहान मुलगी आहे का, जिला कुठे नेले जात आहे हे कळणार नाही. 10 वर्षाच्या मुलीलाही तुरुंग कसा असतो हे कळते,' असे सुकेश म्हणाला आहे.
चाहतने यापूर्वीच पोलिसांत तक्रार का केली नाही?
सुकेश चाहतला व्यावसायिक लबाड म्हणतो. त्याने पत्रात लिहिले की, 'चाहतचा दावा आहे की, तिची फसवणूक करुन तिला तुरुंगात आणले गेले, मग तिने पोलिसांना हे आधीच का सांगितले नाही? 2018 नंतर तिला पोलिसांत तक्रार करण्यापासून कोणी रोखले होते?,' असा प्रश्न सुकेशने उपस्थित केला आहे.
चाहत म्हणाली होती - तिला तिच्या दोन मुलांची खूप काळजी वाटत होती
सुकेशने आपल्याला कसे फसवले याविषयी अभिनेत्री चाहत खन्नाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘ई-टाइम्स’बरोबर संवाद साधताना चाहत खन्नाने सुकेशने तिला बरंच ब्लॅकमेल केल्याचे स्पष्ट केले होते. चाहत खन्नाला एके दिवशी एका शाळेतील कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन तिला तिहार जेलमध्ये नेल्याचाही तिने या मुलाखतीत खुलासा केला होता. तिला तिहार जेलमध्ये फसवून आणले गेले होते. तेव्हा ती चांगलीच घाबरली होती, तिला तिच्या दोन मुलांची खूप काळजी वाटत होती, असे चाहतने सांगितले होते.
चाहतने मुलाखतीत खुलासा करताना म्हटले होते की, "मला आठवते की, जेलची खोली लॅपटॉप, महागडी घड्याळे आणि इतर मौल्यवान वस्तूंनी पूर्णपणे भरलेली होती. याबरोबरच तिथे बऱ्याच ब्रॅंडेड बॅग्ससुद्धा होत्या. त्या छोट्याशा खोलीत सोफा, एसी, खुर्ची, फ्रीज अशा सगळ्या सुखसोयी होत्या."
सुकेशने लग्नाची मागणी घातली होती
सुकेशच्या भेटीबद्दल चाहत म्हणाली, "तो जेव्हा मला भेटला तेव्हा त्याने कबूल केले की, तो माझा खूप मोठा चाहता आहे, माझी मालिका तो आवर्जून पाहतो. मला या जेलमध्ये का आणले आहे असा प्रश्न जेव्हा मी केला तेव्हा अचानक तो खाली वाकला आणि गुडघ्यावर बसला आणि त्याने मला लग्नासाठी प्रपोज केले. मी ओरडून त्याला माझे लग्न झाले असून मला दोन मुले असल्याचे सांगितले. त्यावर त्याने माझा पती माझ्यासाठी योग्य नसल्याचे सांगितले आणि माझ्या मुलांसाठी तोच योग्य पिता असल्याचाही त्याने दावा केला. हे सगळे पाहून मला तिथे रडूच कोसळले," असे चाहतने सांगितले होते.
सुकेश चंद्रशेखर 210 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी
गेल्या वर्षी, ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि इतरांविरुद्ध 210 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपानुसार, तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना सुकेशने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून पैसे उकळले होते. या खंडणी प्रकरणात ईडीने जॅकलिन आणि नोरा फतेही यांची साक्षीदार म्हणून नोंद केली आहे, त्यामुळे तपास यंत्रणा त्यांना वारंवार चौकशीसाठी बोलावत आहे. जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही व्यतिरिक्त सुकेशने चाहत खन्ना, निक्की तांबोळी आणि नेहा कपूर यांसारख्या अभिनेत्रींना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
जॅकलिनला दिल्या होत्या महागड्या भेटवस्तू
सुकेशने जॅकलिनला 52 लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर 9 लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.