आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारवींद्र संगीत गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या गायिका सुमित्रा सेन यांचे निधन झाले आहे. त्या 89 वर्षांच्या होत्या. मंगळवारी (3 जानेवारी) कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमित्रा ब्रॉन्को-न्युमोनियाने त्रस्त होत्या. त्यांना 29 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या दोन मुली श्रावणी आणि इंद्राणी यांनी त्यांना त्यांच्या घरी आणले होते. यानंतर 2 जानेवारीला त्यांची प्रकृती बिघडली आणि 3 जानेवारी रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.
सुमित्रा सेन यांच्या मुलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. सुमित्रा यांना दोन मुली असून त्या रवींद्र संगीतामध्ये लोकप्रिय गायिका म्हणून परिचित आहेत. त्यांची मुलगी श्रावणी यांनी पोस्ट शेअर करताना म्हटले, आई आम्हाला आज सकाळी सोडून गेली. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.
ममता बॅनर्जी यांनी श्रद्धांजली वाहिली
सुमित्रा सेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'अनेक दशकांपासून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सुमित्रा सेन यांच्या आकस्मिक निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. माझे त्यांच्याशी जवळचे संबंध होते. त्यांना पश्चिम बंगाल सरकारने 2012 मध्ये संगीत महासन्मान देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने संगीत जगताचे मोठे नुकसान झाले आहे. सुमित्रा दीदींच्या मुली इंद्राणी आणि श्रावणी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मी सहानुभूती व्यक्त करते.'
सुमित्रा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी गायली
सुमित्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीत 'मेघ बोलछे जाबो जाबो', 'तोमरी झरने निरंजन', 'सखी भाबोना कहारे बोले', 'अच्छे देखो अच्छे मृत्यू' इत्यादी अनेक हिट गाणी गायली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.