आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनिधी चौहानचे खासगी आयुष्य:कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन सुनिधीने केले होते पहिले लग्न, वर्षभरातच मोडला संसार, आता दुस-या लग्नावर उपस्थित झाले प्रश्नचिन्ह

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनिधीचे दुसरे लग्न मोडणार असेही ऐकायला मिळत होते.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. सुनिधी आणि तिचा पती हितेश सोनिक यांच्यात सर्वकाही आलेबेल नसल्याच्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहेत. दोघेही वेगळे राहत असल्याचेही म्हटले जात आहे. वृत्तानुसार, सुनिधी आणि तिचा पती हितेश काही दिवसांपूर्वी गोव्याला फिरायला गेले होते. मात्र तिकडून परत आल्यापासूनच त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. या दोघांचे लग्न मोडणार असेही ऐकायला मिळत होते. मात्र आता सुनिधीने स्वतः या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. ती म्हणाली की आता ती आणि हितेश एकत्र राहत असून त्यांच्यात आता सगळं काही ठीक आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, दोघांमध्ये काही कारणाने वाद सुरु होते. मात्र आता सगळं ठीक असून दोघे एकत्र राहत आहेत.

2012 मध्ये केले होते दुसरे लग्न
पहिले लग्न मोडल्यानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी 24 एप्रिल 2012 रोजी सुनिधीने दुसरे लग्न केले होते. बालपणीचा मित्र आणि म्युझिक डायरेक्टर हितेश सोनिकबरोबर सुनिधीने दुसरा संसार थाटला. हितेशने अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले आहे. यात 'प्यार का पंचनामा', 'प्यार का पंचनामा 2', 'माय फ्रेंड पिंटो', 'मांझी द माउंटेन मॅन', 'स्टेनली का डब्बा' आणि 'काय पो चे' या चित्रपटांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2018 रोजी सुनिधीने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता.

कुटुंबीयांच्या मनाविरोधात जाऊन केले होते पहिले लग्न
सुनिधीने पहिले लग्न 2002 मध्ये वयाच्या 18 वर्षी दिग्दर्शक बॉबी खानबरोबर केले होते. या लग्नाला सुनिधीच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र तिने घरच्यांच्या विरोधात जाऊन बॉबीबरोबर लग्न केले. पण फार काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि अवघ्या वर्षभरातच दोघे विभक्त झाले. सुनिधीने एका मुलाखतीत सांगितले होते की, बॉबीसोबत ती खूश होती. सासरचेदेखील तिच्यावर खूप प्रेम करत होते. मात्र हे लग्न का मोडले, याचा खुलासा सुनिधीने कधीच केला नाही.

वयाच्या चौथ्या वर्षीपासून गातेय सुनिधी
14 ऑगस्ट 1983 रोजी दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते.शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. तबस्सुम यांनीच सुनिधीची भेट प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी सोबत घालून दिली. त्यांनी सुनिधीला त्यांच्या ग्रुपमध्ये गाण्याची संधी दिली होती.

रामगोपाल वर्मा यांनी दिली बॉलिवूडमध्ये पहिली संधी
वयाच्या 13व्या वर्षी 'मेरी आवाज सुनो' या शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सुनिधीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला होता. 'मस्त' या चित्रपटातील 'रुकी रुकीसी जिंदगी...' हे तिने गायलेले पहिले बॉलिवूड गाणे आहे. हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्यासाठी सुनिधीला तब्बल 14 वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी दोन अवॉर्ड्स सुनिधीने आपल्या नावी केले. त्यानंतर सुनिधीने कधीही मागे वळून पाहिले नाही. केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेत तिने गाणी गायली आहेत.

बातम्या आणखी आहेत...