आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल 23 जानेवारीला विवाहबंधनात अडकले. दरम्यान, लग्नाला उपस्थित असलेल्या एका इंडस्ट्रीतील व्यक्तीने सांगितले की, अथियाच्या सप्तपदीवेळी वडील सुनील खूप भावूक झाले होते.
अथियाच्या सप्तपदीवेळी सुनील यांच्या डोळ्यात तरळले पाणी
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आथिया आणि राहुल यांच्या लग्नात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा खुलासा केला आहे. आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नात सुनील प्रचंड भावनिक झाले होते. विशेषतः त्यांच्या सप्तपदीच्या वेळी सुनील आपल्या डोळ्यातले अश्रू अडवू शकले नाहीत. तो क्षण सुनील यांच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण होता. त्यांना पाहून इतर पाहुणेही भावुक झाले होते.
जोरात केली मुलीच्या लग्नाची तयारी
सूत्राने पुढे सांगितले की, 'सुनील यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची सर्व तयारी अगदी जोरात केली. त्यांनी वैयक्तिकरित्या सर्व व्यवस्था पाहिली आणि मीडियाला मिठाई देण्यासोबतच त्यांनी लग्नाची सर्व व्यवस्था अतिशय चोख हाताळली.'
तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले
लग्नानंतर अथिया आणि केएल राहुलने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अथियाने लिहिले आहे की, 'मी तुझ्या प्रकाशात प्रेम करायला शिकले आहे.' अथियाने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "आज आपण आपल्या प्रिय लोकांसोबत अशा घरात लग्न करत आहोत ज्यांनी आपल्याला खूप आनंद आणि शांती दिली आहे. या नवीन प्रवासासाठी आम्ही मनापासून तुमचे आशीर्वाद घेत आहोत."
अथिया-राहुलच्या लग्नाला केवळ 100 लोक उपस्थित होते
अथिया आणि केएल राहुलने लग्नापूर्वी 4 वर्षे एकमेकांना डेट केले. 23 जानेवारी रोजी हे दोघे साताजन्माच्या गाठीत अडकले. लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसह केवळ 100 लोक उपस्थित होते. अथियाच्या खास मैत्रिणी कृष्णा श्रॉफ, अंशुला कपूर, डायना पेंटी यांनी लग्नाला हजेरी लावली होती. याशिवाय क्रिकेटर इशांत शर्मा आणि वरुण एरोन देखील लग्नात पोहोचले होते. येथे येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या हातात रेड बँड बांधण्यात आला होता. या बँडशिवाय कोणीही आत जाऊ शकत नव्हते. लग्नस्थळाबाहेरही कडक सुरक्षा तैनात होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.