आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेक पोस्टरविरोधात कारवाई:सुनील शेट्टीने पोलिसांत दाखल केली तक्रार, ‘बालाजी मीडिया'च्या विरोधात दिली तक्रार, केले गंभीर आरोप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनील शेट्टी यांनी बुधवारी वर्सोवा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली.

‘बालाजी मीडिया’ या मुंबई प्रॉडक्शन कंपनीविरूद्ध बनावट चित्रपटाचे पोस्टर्स शेअर केल्याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीने तक्रार दाखल केली आहे. या पोस्टरमध्ये सुनील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. शेट्टी यांनी बुधवारी वर्सोवा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली.

हे कलाकारांचे शोषण : सुनील शेट्टी
अहवालात त्यांनी अशी नोंद केली की, बालाजी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने त्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्या फोटोचा वापर केला आणि मी त्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असल्याचा खोटा प्रचार केला. हा चित्रपट कोणता आहे आणि ते लोक कोण आहेत, याची मला कल्पना नाही. मी हा चित्रपट साइन केलेला नाही. ते कलाकारांना त्रास देत आहेत. माझ्या नावाचा गैरवापर करून ते चित्रपट फायनान्स करुन घेत आहेत. यामुळे मला मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे मी तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

प्रॉडक्शन कंपनीने दिले स्पष्टीकरण
सुनील शेट्टींच्या आरोपांवर प्रॉडक्शन कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीचे मॅनेजर रणवीर सिंहने आपली चुक कबुल करताना ते दोन चित्रपटांसाठी कास्टिंग करत असल्याचे सांगितले. लूक चेक करण्यासाठी त्यांनी सुनील शेट्टी आणि बॉबी देओल यांचे पोस्टर बनवले होते, ते पोस्टर कुणीतरी सोशल मीडियावर लीक केले, असे त्यांनी सांगितले. सिंह म्हणाले की, आता हे पोस्टर सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आले आहे. सुनील शेट्टी यांच्या पोस्टरचा वापर पैसे कमावण्याच्या हेतूने केला नसल्याचे स्पष्टीकरण सिंह यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...